हेलिकॉप्टर्स तपासणार, ATM Van वर निर्बंध आणि अ‍ॅम्ब्युलन्सवर नजर; निवडणूक आयोगाची माहिती

हेलिकॉप्टर्स तपासणार, ATM Van वर निर्बंध आणि अ‍ॅम्ब्युलन्सवर नजर; निवडणूक आयोगाची माहिती

निवडणूक काळात अवैधरित्या पैश्यांची वाहतूक होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने बँकांवर वेळेचे निर्बंध घातले आहेत. तसेच हवाईमार्गे बेकायदेशीर गोष्टी होऊ नये म्हणून हेलिकॉप्टर्सची तपासणी होणार आहे.

मुंबईत आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की महाराष्ट्राला सहा राज्यांच्या सीमा आहेत. या सीमांवर 300 चेकपोस्ट तयार केल्या जातील. जेणेकरून अवैध रोख रक्कम, अंमली पदार्थ, दारू राज्यात आणण्यापूर्वी रोखली जाईल. तसेच रुग्णवाहिका आणि एटीएममध्ये रोख रोक्कम भरण्यासाठी जी कॅश व्हॅन वापरली जाते त्यावरही नजर ठेवली जाईल. संध्याकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी आठ वाजेपर्यत या व्हॅन वापरल्या जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश कुमार यांनी दिले आहे. तसेच निवडणूक प्रचाराच्या काळात हेलिकॉप्टरचा वापर होतो. अशा वेळी हवाई मार्गे बेकायदेशीररित्या वस्तूंची वाहतूक होऊ नये म्हणून सर्व हेलिपॅड्सवर हेलिकॉप्टर्सची तपासणी केली जाईल असेही कुमार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुणालाही मुख्यमंत्री करा पण… दीपक केसरकर यांचं विधान काय? कुणालाही मुख्यमंत्री करा पण… दीपक केसरकर यांचं विधान काय?
शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रीपदावरून भुवया उंचावणारं विधान केलं आहे. फिरता मुख्यमंत्री कधी ऐकलं नाही. फिरता चषक ऐकला...
काँग्रेसच्या काळातील योजना खड्ड्यात घालण्यासाठी होत्या का?; राज ठाकरे यांना कुणी केला सवाल?
धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी सत्ताधारी आमदारच आंदोलन करणार; सरकारची डोकेदुखी वाढली
‘कोई मिल गया’ सिनेमानंतर रजत बेदीने अचानक का सोडलं बॉलिवूड आणि देश?
मौनी रॉय हिचा लाल बिकिनीमध्ये जलवा, अभिनेत्री थेट मालदीवमध्ये आणि…
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यावर भिडेच्या लेकीचा गंभीर आरोप
सैफ अली खान याचा पहिल्यांदाच करीना कपूर हिच्याबद्दल ‘तो’ मोठा खुलासा, अभिनेता थेट म्हणाला…