Ind Vs Ban 2nd Test – पावसाने खेळ केला! एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसावर फेरलं पाणी

Ind Vs Ban 2nd Test – पावसाने खेळ केला! एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसावर फेरलं पाणी

हिंदुस्थानविरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवसही पावसामुळे पाण्यात गेला आहे. कानपुरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू न होता संपूष्टात आला.

हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना कानपुरमध्ये शुक्रवार (27 सप्टेंबर 2024) पासून सुरू झाला आहे. मात्र पावसाचा व्यत्यय आणि अपुऱ्या प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ फक्त 35 षटकांचा होऊ शकला. 35 षटकांमध्ये बांगलादेशने तीन विकेट गमावत 107 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी आकाश दिपने 2 आणि रविचंद्रन अश्विनने 1 विकेट घेतली. मोमिनुल हक 40 धावा आणि मुशफिकूर रहिम 06 धावाांवर नाबाद आहेत. त्यामुळे शनिवारी (28 सप्टेंबर 2024) बांगलादेशच्या धावसंख्येत भर घालण्यासाठी दोन्ही फलंदाज उत्सुक होते. मात्र त्यांच्या उत्सुकतेवर पावसाने पाणी फेरलं

शनिवारी कानपुरमध्ये पावसाने तुफान बॅटींग केली. त्यामुळे सामना सुरू करता आला नाही. आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ सुद्धा पावसाच्या बॅटींगमुळे रद्द करावा लागला. त्यामुळे आता दोन्ही संघांना उद्या (29 सप्टेंबर 2024)  संघांना तिसऱ्या दिवसाची प्रतिक्षा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुणालाही मुख्यमंत्री करा पण… दीपक केसरकर यांचं विधान काय? कुणालाही मुख्यमंत्री करा पण… दीपक केसरकर यांचं विधान काय?
शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रीपदावरून भुवया उंचावणारं विधान केलं आहे. फिरता मुख्यमंत्री कधी ऐकलं नाही. फिरता चषक ऐकला...
काँग्रेसच्या काळातील योजना खड्ड्यात घालण्यासाठी होत्या का?; राज ठाकरे यांना कुणी केला सवाल?
धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी सत्ताधारी आमदारच आंदोलन करणार; सरकारची डोकेदुखी वाढली
‘कोई मिल गया’ सिनेमानंतर रजत बेदीने अचानक का सोडलं बॉलिवूड आणि देश?
मौनी रॉय हिचा लाल बिकिनीमध्ये जलवा, अभिनेत्री थेट मालदीवमध्ये आणि…
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यावर भिडेच्या लेकीचा गंभीर आरोप
सैफ अली खान याचा पहिल्यांदाच करीना कपूर हिच्याबद्दल ‘तो’ मोठा खुलासा, अभिनेता थेट म्हणाला…