आंब्यासोबत कधीही या 5 गोष्टी खाऊ नका, आरोग्यास ठरतील हानीकारक
दही: आंब्यासोबत दही खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. याचं कारण म्हणजे दोन्ही गोष्टींचं परिणाम वेगवेगळे आहेत. अशा परिस्थितीत, त्यांचं एकत्र सेवन केल्याने गॅस, अपचन किंवा पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त, जेव्हा उष्ण आणि थंड स्वरूपाचे पदार्थ एकत्र येतात तेव्हा त्वचेवर फोड किंवा ऍलर्जी देखील होऊ शकते.
मसालेदार पदार्थ: मिरच्या, गरम मसाला किंवा आंब्यासोबत तळलेले पदार्थ यांसारखे मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते.
थंड पेये: आंबे खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी, थंड पेये पिणे किंवा आईस्क्रीम खाणे पचनसंस्थेला मंदावू शकते. ज्यामुळे पोटफुगी होऊ शकते. शिवाय, आंबा आणि कोल्ड्रिंक दोन्ही अत्यंत गोड आहेत. त्यांचे एकत्र सेवन केल्याने शरीरात साखरेची पातळी अचानक वाढू शकते, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List