सलमानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; करुणा शर्मांना वेगळाच संशय, केलं मोठं वक्तव्य

सलमानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; करुणा शर्मांना वेगळाच संशय, केलं मोठं वक्तव्य

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, सलमानची गाडी बॉम्बने उडवून देऊ, सलमानच्या घरात घुसून त्यालाही बॉम्बने उडवू, असं धमकीमध्ये म्हटलं आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्स ॲप क्रमांकावर ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  आता या प्रकरणात करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या करुणा शर्मा?

सलमान खान धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. फक्त सलमान खानलाच का धमक्या मिळत आहेत, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारला धमक्या का येत नाहीत?  मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीत फक्त हिंदू, मुस्लिम आणि ओबीसींशिवाय दुसरा कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नाही, पण आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सुरक्षा देण्यास सक्षम आहेत, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक काराडच्या एन्काऊंटरची ऑफर आपल्याला देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी केला आहे. रंजित कासले यांच्या या दाव्यावर देखील करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाल्मिकच्या सुपारीबाबतचा दावा खरा असू शकतो, कारण धनंजय मुंडेंचे सगळे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत, त्यामुळे हे होऊ शकतं.  पाच कोटी रुपये ही खूप छोटी रक्कम आहे, या लोकांकडे प्रचंड पैसा आहे. अंजलीताई दमानिया तर दररोज नव-नवे खुलासे करत आहेत, मात्र अनेक प्रकरणं पैशांच्या जोरावर दाबले जात आहेत, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. तसेच सलमान खान धमकी प्रकरणात बोलताना देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, फक्त सलमान खान यालाच का धमकी आली, इतरांना का धमक्या येत नाहीत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News