जया बच्चन सर्वांसमोर ऐश्वर्याला असं काय म्हणाल्या, रडू लागली सून, व्हिडीओ व्हायरल
Aishwarya Rai Bachchan and Jaya Bachchan: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना जोर धरला आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जया बच्चन, सून ऐश्वर्या राय हिच्याबद्दल असं काही म्हणतात ज्यामुळे अभिनेत्रीला डोळ्यात पाणी आलं. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नापूर्वीचा आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ 2007 मधील असून फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात जया बच्चन ऐश्वर्या हिचं कुटुंबात स्वागत करताना दिसत आहेत. शिवाय तेव्हा जया बच्चन यांनी ऐश्वर्याचं कौतुक देखील केलं.
पुरस्कार स्विकारताना जया बच्चन म्हणाल्या, ‘पुन्हा एकदा एका प्रेमळ मुलीचा सासू होणार आहे. जिच्याकडे मुल्य, महान प्रतिष्ठा आणि सुंदर स्मित हास्य आहे… तुझं मी कुटुंबात स्वागत करते. मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करते.’ सांगायचं झालं तर, अनेकदा जया बच्चन यांनी ऐश्वर्या रायचं स्वागत केलं आहे.
‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये देखील ऐश्वर्याबद्दल जया बच्चन यांना विचारण्यात आलं होतं. तेव्हा जया बच्चन म्हणाल्या होत्या की, ‘मला असं वाटतं हे फार चांगलं आहे, कारण ऐश्वर्या स्वतःच एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण जेव्हा आम्ही सोबत असतो तेव्हा ऐश्वर्या कधीच पुढे-पुढे करत नाही. ती सर्वात मागे असते… तिचे हेच गुण मला प्रचंड आवडतात… ती शांत असते. गोष्टी ऐकते आणि काही समजून घेते… ‘
पुढे जया बच्चन म्हणाल्या होत्या, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कुटुंबात मिसळली आहे. फक्त कुटुंबातील सदस्यांसोबतच नाही तर, मित्र परिवाराबद्दल देखील ऐश्वर्याला माहिती झालं आहे आणि असंच असलं पाहिजे.’ पण आता ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यामध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे.
सांगायचं झालं तर, ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी गोंडस मुलीचं जगात स्वागत केलं. दोघांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा…
नुकताच टॅरो कार्ड रीडर गीतांजली सक्सेना यांनी मुलाखतीत दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. गीतांजली यांनी दावा केला आहे की, सप्टेंबरपर्यंत दोघांनी त्यांचं नातं जपलं पाहिजे. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात कधीच अडचणी येणार नाहीत. जर सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांच्यातील वाद संपले नाहीत, तर दोघांची विभक्त होण्याची शक्यता आहे… सध्या सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List