‘ओवर एक्टिंग की दुकान’, रश्मिका मंदानाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते भडकले; केलं ट्रोल
अभिनेत्री रश्मिका मंदाना आज फक्त साउथमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही तेवढीच लोकप्रिय आहे. तिचे चाहते दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. पण एका व्हिडीओमुळे मात्र तिच्या चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. रश्मिका मंदानाने नुकताच तिचा 29 वा वाढदिवस साजरा केला. त्याच दरम्यान तिने एक व्हिडीओही शेअर केला. मात्र त्याच व्हिडीओवरून तिला ट्रोल करण्यात येत आहे.
इंस्टाग्रामवर या सेलिब्रेशनचे अनेक फोटो
रश्मिकाने तिच्या इंस्टाग्रामवर या सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. रश्मिकाने तिचा वाढदिवस कुठे साजरा केला हे मात्र उघड केलं नाही, परंतु अभिनेत्री समुद्रकिनाऱ्यावर मजा करताना दिसली. त्याच वेळी, रश्मिकाने स्वतःचा एक व्हिडिओ देखील शेअर केला, ज्यामध्ये ती नाचताना आणि स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत होती. पण युजर्सना त्या तिचे हे कृत्य आवडले नाही आणि आता त्यांनी तिला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
व्हिडिओमध्ये ती लहान मुलासारखी बोलत असल्याचं दिसून आलं.
रश्मिकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती लहान मुलासारखी बोलत असल्याचं दिसून आलं. तिने स्वतःसाठी ‘हॅपी बर्थडे टू राशी’ हे गाणे गायलं आहे आणि गाणं गात गात ती नाचताना पण दिसली. यावेळी रश्मिका ब्लू प्रिंटेड ड्रेस आणि मोकळ्या केसांमध्ये गोंडस दिसत होती. पण दुसरीकडे, नेटकऱ्यांना तिचे ते लहान मुलासारखे वागणे आवडले नाही. त्यामुळे तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये तिला जोरदार ट्रोल करत आहेत. एकाने लिहिलं- ‘तू लहान मुलासारखा का वागतेयस?’, तर दुसऱ्या युजरर्सने लिहिलं आहे ”ओवर एक्टिंग की दुकान”, तिसऱ्याने लिहिले- ‘इरिटेटिंग’, तर एका युजर्सने रश्मिकाला अभिनय शिकण्याचा सल्लाही दिला.
विजयसोबत साजरा केला वाढदिवस ?
रश्मिका हे नाव बऱ्याच काळापासून दक्षिण इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा यांच्याशी जोडले गेले आहे. युजर्सनी असाही दावा केला आहे की, अभिनेत्रीने तिचा वाढदिवस तिच्या कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडासोबत साजरा केला. रश्मिकाने शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये चाहत्यांनी विचारले आहे की हे कोणी शूट केले आहे. त्याच वेळी, काहींनी असेही लिहिले की विजयने तिचा व्हिडिओ बनवला आहे. रश्मिकाने तिचे फोटो शेअर केले आहेत.
विजयने त्याच ठिकाणचे फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अशा परिस्थितीत, चाहत्यांना खात्री पटली आहे की दोघांनीही त्यांचा वाढदिवस एकत्र साजरा केला आहे. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, रश्मिका अलीकडेच सलमान खानसोबत ‘सिकंदर’ चित्रपटात दिसली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List