मोठी बातमी! ‘माझ्या मुलीला…’, निकाल लागताच करुणा शर्मांचा पहिल्यांदाच सनसनाटी आरोप

आज करुणा शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांची याचिका माझगाव सत्र न्यायालयानं फेटाळली आहे. करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निकाल न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे. करुणा शर्मा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे धनंजय मुंडेंची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. करुणा शर्मा यांनी न्यायालयामध्ये धनंजय मुंडेंचं स्वीकृतीपत्र आणि अंतिम इच्छापत्र तसेच आपला पासपोर्ट आणि रेशनकार्ड न्यायालयात सादर केलं. या कागदपत्रांवर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे, त्यामुळे करुणा शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे ही कागदपत्रं खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. दरम्यान माझगाव कोर्टानं दिलेल्या निकालानंतर करुणा शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं काय म्हणाल्या करुणा शर्मा?
मी न्यायाधीश यांचे आभार मानते की मला न्याय मिळाला. आज सत्याचा विजय झाला. मी सात ते आठ वेळा धनंजय मुंडे यांना तोंडावर पाडलं आहे. महिलांसाठी ही एक आदर्श केस आहे. राज्याची सिस्टीम ढासळली आहे, मी खरी होते, म्हणून मंत्र्यांना हरवू शकले. मीच मुंडे यांची पहिली बायको असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यासाठी पोटगी मिळाली आहे. लग्नाचे फोटो व पुरावे मी मिडीयावर टाकणार आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान करुणा शर्मा यांना प्रेमजाळ्यात फसवून लग्न केल्यास त्याला २० लाख देण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. मुंडे यांची गँग हे षडयंत्र रचत आहे. धनंजय मुंडे यांचं एवढं डोकं नाहीये. बीडचा आका आत गेला आहे, पण आता हे काम पुण्याचा आका करत आहे, असा आरोप यावेळी करुणा शर्मा यांनी यावेळी केला आहे.
मुंडे यांच्या विरोधात बोलल्यास माझ्या मुलीला उचलून नेण्याची धमकी दिली जात आहे. शिवानीला उचलून नेण्याची धमकी मला त्यांचे लोक देत आहेत. मी या प्रकरणात तक्रारही केली आहे. मी तक्रार करून पाच ते सहा दिवस झाले आहेत. व्हॉटसअपवर मला धमकी दिली जात आहे, असा आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List