काही सातबारे रामाच्या नावावर, काही विठ्ठलाच्या नावावर…वक्फची जमीन…जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
वक्फची जमीन ही कोणाचीही जमीन नाही. वक्फची जमीन ही परंपरेने दानात दिलेल्या जमिनी आहेत. आपल्याकडे काही सातबारे हे रामाच्या नावाने आहेत. काही सातबारे विठ्ठलाच्या नावावर आहेत. काही पांडुरंगाच्या नावावर आहेत. या देवस्थानाच्या जमीन आहेत. त्याची विल्हेवाट लावता येत नाही. परंतु महाराष्ट्रात देवस्थानच्या जमिनी खाल्ल्याचे देखील प्रकार आहेत. ते कोणी खाल्ले हेही सर्वांना माहिती आहे. देवस्थानच्या जमिनीची लूटमार सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, वक्फच्या जमिनी समजून घ्या. या जमिनी श्रीमंत मुसलमानांनी आपल्या समाजाच्या हितासाठी, धर्मकार्यासाठी, शिक्षणासाठी दिल्या आहेत. सरकारने कधीकाळी दिलेल्या जमिनी या नाहीत. ताजमहल वक्फची जमीन आहे. ती जमीन विकता येणार नाही. हे मी मंत्री असताना फायलीवर लिहून ठेवले होते. या प्रकरणावर मी काम केले आहे, त्यामुळे मला सर्व माहीत आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.
वक्फची जमीन अशी जमीन आहे की त्याला एकदा वक्फ लागले सात बाऱ्यावरुन ते कमीच करू शकत नाही. त्याला सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे. सरकारकडून अपेक्षा काय असते तर या जमिनी समाज हितासाठी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये हेराफेरी करून जर कोणी खाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखायला पाहिजे. सरकारने हस्तक्षेप करून त्यात गोंधळ निर्माण करणे हे अभिप्रेत नाही. आपण संसदेतून बोलतो. त्याचाही भान राहिले त्यांना राहिला नाही. त्यांचा धर्म द्वेष इतका वाढला की आपल्याला धर्मद्वेषा विष पेरायला सगळी माध्यम पण कमी पडाली, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
गडकरी यांचे केले कौतूक
नितीन गडकरी यांनी शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरी योग्य बोलले. कारण ते पुस्तके वाचतात. जे पुस्तकच वाचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? इतिहास असे सांगतो अफजलखानाचा वध झाल्यानंतर जेव्हा मासाहेबांना समजले की अफजलखानाला संपला. तेव्हा त्यांनी सांगितले त्याच्या धर्मानुसार त्याचा विधी व्हायला हवा. आपले वैर संपले. त्यामुळे त्याची कबर येथे सन्मानाने योग्य विधी करून केली. परंतु आपल्याला राजकारण करायचे आहे. आपल्याला हिंदू मुसलमान वाद पेटवायचे आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List