वक्फ सुधारणा विधेयकाबाबत अजितदादांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय? सुनील तटकरे पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत अजितदादांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय? सुनील तटकरे पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

बुधवारी लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात आलं. हे विधेयक लोकसभेत सादर होताच विरोधकांनी मोठा गोंधळ केल्याचं पाहायला मिळालं. दिवसभर  आणि रात्री उशिरापर्यंत या विधेयकावर चर्चा सुरू होती. त्यानंतर मध्यरात्री या विधेयकावर मतदान घेण्यात आलं. विधेयकाच्या बाजुनं 288 मत पडली तर विधेयकाच्या विरोधात 232 मतं पडली. हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. त्यानंतर आता या विधेयकावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले तटकरे? 

आम्ही वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे, मुस्लिम समाजामध्ये विरोधकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.  राष्ट्रपतींच्या सहीनंतर विधेयकाची अंमलबजावणी होईल. मुस्लिम समाजाला न्याय देणारे हे विधेयक आहे, समाज्याच्या प्रगतीसाठी हे विधेयक आहे. आम्ही पाठिंबा दिला, समर्थन केलं, बोलल्याने समर्थन आहे हे सिद्ध होतं, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, इतर पक्षांची भूमिका काय होती, त्याबाबत मी बोलणार नाही. कोंडी कोणाची झाली त्यावरही बोलणार नाही. हे विधेयक धार्मिक नाही, वक्फ बाबत वास्तविकता समोर येण्यासाठी हे विधेयक आहे, असं यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या विधेयकावर चर्चे सुरू असताना लोकसभेत चांगलाच गोंधळ झाला. विधेयक लोकसभेत सादर होताच विरोधकांनी गोंधळ घातला, तर सत्ताधारी देखील या विधेयकाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसभर या विधेयकावर चर्चा झाली. त्यानंतर मध्यरात्री हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं. विधेयकाच्या बाजूनं 288 मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 232  मतं पडली. अखेर हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Manoj Kumar यांची अखेरच्या क्षणी कशी होती अवस्था, कोणाशी साधला शेवटचा संवाद? मुलगा म्हणाला… Manoj Kumar यांची अखेरच्या क्षणी कशी होती अवस्था, कोणाशी साधला शेवटचा संवाद? मुलगा म्हणाला…
Manoj Kumar: ‘जिंदगी एक पहेली है, कभी दुश्मन कभी सहेली है…’, आपल्या सिनेमांमधून अनेकांना जगण्याची नवी उमेद देणारे दिग्गज अभिनेते...
राज कुमार यांनी हत्या का केली? जुहू बीचवर मुलीसोबत काय घडलं? अभिनेत्याने रागाच्या भरात केली हत्या
होय, मी अपशब्द म्हणालो पण त्यापेक्षा मोठी शिवी..; अक्षय कुमार असं का म्हणाला?
धनंजय माने इथेच राहतात का? Ghibli वर ‘अशीही बनवाबनवी’ ट्रेंड; डायलॉग ओळखाच
Manoj Kumar: ओसामा बिन लादेनच्या हत्येची जागा आणि ‘त्या’ जागेसोबत मनोज कुमार यांचं खास कनेक्शन
मनोज कुमार यांनी कुटुंबासाठी किती मिलियन डॉलर्सची संपत्ती मागे सोडली?
’95 टक्के महिलांना…’, सेक्सबद्दल नीना गुप्ता यांचं मोठं वक्तव्य, पुरुषांबद्दल म्हणाल्या…