उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; बडा नेता सोडणार साथ, उद्या मुंबईत मोठा पक्षप्रवेश
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महाविकास आघाडीची ताकद वाढल्याचं दिसून येत होतं. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला, पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं. या निवडणुकीमध्ये महायुतीला 232 जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीचे तीनही पक्षा मिळून केवळ 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. सर्वाधिक जागा जिंकत विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर शिवसेना शिंदे गटाला देखील या निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. अनेक दिग्गज नेते महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जात असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसत आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संदेश कार्ले हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत. उद्या मुंबईमध्ये ते आपल्या शकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यापूर्वी देखील अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List