‘छावा’मुळे शरीरात संचारते वेगळीच ऊर्जा, ‘या’ 5 कारणांमुळे सिनेमा ठरतोय ‘मस्ट वॉच’
5 Reasons To Watch Chhaava: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची दमदार भूमिका साकारत विकी याने स्वतःचं नाव बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्यांच्या यादीत नोंदवलं आहे. ‘छावा’ सिनेमामुळे विकी कौशल याच्या करीयरला एक वेगळी दिशा मिळाली आहे. सिनेमा पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर देखील दमदार भूमिका साकारताना दिसत आहे. प्रेक्षकांना सर्व थिएटर हाऊस फूल केली आहेत. सांगायचं झालं तर, सिनेमात अशी 5 कारणं आहेत, ज्यामुळे सिनेमा ‘मस्ट वॉच’ ठरत आहे…
प्रेक्षकांना ‘छावा’ का पाहिला पाहिजे?
‘छावा’ हा एक ऐतिहासिक सिनेमा आहे किंवा त्याऐवजी तो एक उत्कृष्ट मास्टरपीस आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि 31 कोटींच्या कलेक्शनसह ओपनिंग केलं. सिनेमात अनेक कारणं आहेत ज्यामुळे तो सिनेमागृहात पाहणे आवश्यक आहे.
विकी कौशलचं दमदार अभिनय : ‘मसान’ (2015), ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ (2019), ‘सरदार उधम सिंह’ (2021) यांसारख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत विकी कौशल चर्चेत आला. पण ‘छावा’ सिनेमामुळे अभिनेत्याच्या करीयरचा ग्राफ चढत्या क्रमावर पोहोचला आहे. महाराजांची भूमिका साकारण्यासाठी विकीने प्रचंड मेहनत घेतल्याचं सिनेमात दिसत आहे. ‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर शरीरात वेगळीच ऊर्जा संचारते. सिनेमात विकीने अवॉर्ड विनिंग काम केलं आहे.
एका वीर योद्धाची कथा : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. ‘छावा’ सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांचे लष्करी प्रतिभा, राजकीय रणनीती आणि वैयक्तिक बलिदान यावर खोलवर प्रकाश टाकते.
जबरदस्त डायलॉग : ‘फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की’ आणि ‘मौत के घुंघरू पहनके नाचते हैं हम’ यांसारखे दमदार डायलॉग सिनेमात आहेत.
स्टार कास्ट : सिनेमासाठी एकापेक्षा एक कलाकारांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना आणि महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना यांनीही त्यांच्या पात्रांमध्ये प्राण फुंकले आहेत.
उत्तम व्हिज्युअल आणि संगीत : सिनेमातील प्रत्येक सीन अत्यंत बारकाईने शूट आणि एडिट करण्यात आला आहे. युद्ध, किल्ल्यावरील सोहळा अनेक गोष्टींकडे दिग्दर्शकाना लक्ष घातलं आहे. सिनेमातील प्रत्येक उत्तम व्हिज्युअल उत्तम आहे. पण ए.आर. रेहमान यांच्या संगीताने प्रेक्षकांना नाराज केलं आहे.
लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन : दिग्दर्शकाने ‘छावा’मध्ये खोल भावनिक क्षणांसह ऐतिहासिक भव्यतेची सांगड घातली आहे. छावाचा प्रत्येक सीन पाहिल्यानंतर तुम्ही दिग्दर्शकाचे कौतुक कराल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List