शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार, स्वारगेट बसस्थानकाला नीलम गोऱ्हे यांची भेट
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात रिकाम्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर या संशयित आरोपीचे चित्र जाहीर करण्यात आले आहे. या तरुणीने फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध सुरु झाला आहे. या प्रकरणी आता शिवसेनेच्या नेता नीलम गोऱ्हे यांनी स्वारगेट बसस्थानकाला भेट देऊन घटना स्थळाची पाहणी केली आहे.
स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर शिवशाही बसमध्येच पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीचे धाडस झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, शिवसेना नेता नीलम गोऱ्हे यांनी घटना स्थळी ( स्वारगेट ) जाऊन पाहणी केली आहे.
येथे पाहा पोस्ट –
अतिशय संतापजनक!
स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची…— Supriya Sule (@supriya_sule) February 26, 2025
राज्यात आता गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी स्वारगेटची घटना आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी समाज माध्यमावर ट्वीट देखील केले आहे. सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात केलेल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यांवर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
बलात्काराची घटना ही निंदनीय आहे. पण एसटी डेपोमध्ये सुरक्षारक्षक वाढविण्याची गरज आहे. राज्यातील अनेक एसटी डेपोमध्ये सुरक्षारक्षकांची कमतरता आहे. याची दखल एसटी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि एसटी डेपोमध्ये आलेल्या प्रत्येक बसची तपासणी ही केली पाहिजे त्याचबरोबर महिलांना देखील एसटी डेपोमध्ये बसण्यासाठी जागा बनवण्यात आली आहे. त्यांनी देखील त्याच जागेचा वापर केला पाहिजे अशा घटना पुन्हा न होण्यासाठी एसटी प्रशासनाने चांगली व्यवस्था उभी केली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
सराईत गुन्हेगार
दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. आरोपीची ओळख पटली असून आरोपी शिरुर गावचा आहे. काल त्याच्या घरी शेतात पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासणी केली आहे. कालपासून आठ टीम काम करीत आहेत, त्याने ताई म्हणून आवाज दिला आणि या तरुणीशी ओळख करुन घेतली . फलटणची बस वेगळीकडे लागते असे सांगून तो तिला घेऊन गेला आणि नंतर बसचा दरवाजा बंद करुन त्याने तिच्यावर अत्याचार केला आहे. या सगळ्या प्रकारची चौकशी सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी म्हटले आहे. बसच्या चालक आणि वाहकाने बस अशा ठिकाणी उभी करताना तिचे दरवाजे लॉक का केले नव्हते अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List