राज्यात भाजपची महालाट; 1 कोटींहून अधिक सदस्य नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच मोठी बांधणी
भाजपाची राज्यात मोठी लाट आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठी मुसंडी मारली. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. महायुतीत भाजपा हा मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले. तर आता सदस्य नोंदणीतही भाजपाने नवीन विक्रम केला आहे. भाजपचे राज्यात 1 कोटींहून अधिक सदस्य नोंदणी झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच भाजपाने मोठी मोर्चे बांधणी केल्याचे दिसून आले.
हा केवळ आकडा नाही विश्वास
महाराष्ट्र भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर आणि महाराष्ट्रच्या जनतेच्या आशीर्वादाने 1 कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली आहे. 1 कोटी हा केवळ आकडा नसून महाराष्ट्रच्या जनतेचा भाजपा वरील विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी नोंदणी अभियान यशस्वी केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र भाजपासाठी ऐतिहासिक दिवस!
महाराष्ट्र भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर व महाराष्ट्रच्या जनतेच्या आशीर्वादाने १ कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली आहे. हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन!
1 कोटी हा केवळ… pic.twitter.com/AI3UvDgwmO
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 11, 2025
आता लवकरच दीड कोटींचा टप्पा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्राथमिक सदस्यता नोंदणी करत सदस्यता अभियान सुरु केलं होतं. राज्यात देवेंद्र फडणवीस यांची प्राथमिक सदस्यता नोंदणी करत अभियानाला सुरुवात झाली आहे. भाजपनं दीड कोटी सदस्य संख्या असलेली पार्टीचा संकल्प केला होता. एक कोटी सदस्यांच्या आमचा प्रवास आता पूर्ण झाला. राज्यातले मुख्यमंत्री, मंत्री, सर्वांनी भार घेतला. पुढील काही दिवसात १५ लक्ष सदस्य होतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
संघटन पर्व राबवणार
पक्ष संघटना, कार्यकर्ते आम्ही काम करत आहोत. पुढील १५ दिवस आम्ही संघटन पर्व राबवणार आहोत. जवळपास १ लाख बूथवर आम्ही १ कोटी २ लाख सदस्य बनवले आहेत. मला अभिमान आहे, १८५६ कार्यकर्त्यांनी १ हजार सदस्य संख्या पूर्ण केली. १७२६ कार्यकर्त्यांनी ५०० सदस्य संख्या केली.या अभियानात युवा, लाडक्या बहिणी, आदिवासी भागात, बौध्द समाजात सर्वच समाजाने सहयोग घेतला आहे. असा कोणताही समाज नाही ज्याने भाजपचं सदस्यता घेतली नाही. मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज लोकांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List