‘भरपूर सहन केलं…’, गोविंदासोबत लग्न, सुनीता यांना सोसाव्या लागल्या यातना? स्वतःचं केला मोठा खुलासा
बॉलिवूडचा ‘हिरो नं 1’ अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता एकत्र देखील राहत नाहीत. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या फक्त गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीता विभक्त होतील असं सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये वाद सुरु असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
सुनीता आणि गोविंदा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांचं लव्ह मॅरेज झालं आहे. गोविंदासोबत लग्न सुनीताच्या वडिलांना मान्य नव्हत. म्हणून लेकीच्या लग्नाला देखील सुनीता यांचे वडील आले नव्हते.. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. गोविंदासोबत लग्न केल्यानंतर सुनीता यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
एका मुलाखतीत सुनीता म्हणाल्या होत्या, ‘मी माझे पती गोविंदा यांच्यावर प्रचंड प्रेम करत होती. म्हणून मी सर्वकाही सहन केलं. माझी आई हाफ पँट घालायची, पाली हिल सारख्या पॉश ठिकाणी राहत होती. माझ्या आईचं कुटुंब प्रचंड श्रीमंत होतं. त्यामानाने माझ्या वडिलांची आर्थिक बाजू कमकूवत होती.’
‘गोविंदासोबत लग्न केलं तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होती आणि लग्नाच्या 1 वर्षानंतर म्हणजे 19 व्या वर्षी मी एक मुलीची टीनाची आई झाली. मी जेव्हा गोविंदासोबत लग्न केलं तेव्हा त्याचं कुटुंब फार मोठं होतं. 19 व्या वर्षी मला मुलगी झाली तेव्हा मी स्वतःच लहान मुलगी होती… काही कळत नव्हतं…’
लग्नानंतर सुनीता यांना काय म्हणाला गोविंदा?
सुनीता यांनी सांगितल्यानुसार, ‘गोविंदा यांनी मला लग्नानंतर सांगितलं होतं की, माझी आई जोपर्यंत आहे, तोपर्यंत घरातील प्रमुख तिच राहिल… मी देखील त्यांची अट मान्य केली. कारण तेव्हा मी गोविंदावर प्रचंड प्रेम करत होती… ‘ सध्या सर्वत्र गोविंदा आणि सुनीता यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
घटस्फोटाच्या चर्चांवर काय म्हणाला गोविंदा?
रिपोर्टनुसार, गोविंदाला घटस्फोटाबद्दल विचारण्यात येताच अभिनेता म्हणाला, ‘सध्या व्यवसायाबद्दल बोलणं सुरु आहे. मी माझा सिनेमा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे…’ असं म्हणत अभिनेत्याने घटस्फोटाबद्दल बोलणं टाळलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List