श्रीदेवींचं सौंदर्य टिकवण्याचं रहस्य अत्यंत धक्कादायक; पती बोनी कपूर यांनीच केला मोठा खुलासा
बॉलिवूडमधली सर्वांची क्रश असणारी आणि आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे. श्रीदेवी या बॉलीवूडच्या ‘चांदनी’ म्हणून ओळखल्या जातात. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत त्यांचं निधन झालं. भाचा मोहित मारवाहच्या लग्नासाठी त्या दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलच्या खोलीत ती मृतावस्थेत आढळली. तिच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता.
श्रीदेवी यांच्या सौंदर्याचं रहस्य धक्कादायकच
मात्र श्रीदेवी यांच्या निधनासंदर्भात त्यांचे पती बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीच्या निधनानंतर दुबईत बोनी कपूर यांना कशी वागणूक दिली गेली याबाबतही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं
लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण हेच सौंदर्य त्यांचा एकेदिवशी घात करतील हे कदाचित त्यांना माहित नसेल. श्रीदेवी फारट कडक डाएट करत असल्याचं त्यांच्या पती बोनी कपूर यांनी सांगितलं. श्रीदेवी सुंदर दिसण्यासाठी काय करायच्या हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. लोकप्रियता
सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवी यांचा अट्टाहास
श्रीदेवी फिट राहण्यासाठी तासंतास उपाशी राहायच्या. चित्रपटाच्या सेटवर अनेकदा त्यांना चक्कर येत असे. डॉक्टरांनी त्यांना उपाशी न रहाण्याचा किंवा एवढं कडक डाएट न करण्याचा सल्लाही दिला होता पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर जवळपास 7 वर्षांनी, बोनी कपूर यांनी त्यांच्या मृत्यूचे कारण सांगितलं होतं.
क्रॅश डाएट
सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवी ‘क्रॅश डाएट’ करायच्या, जे त्यांच्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक होतं. बोनी कपूर यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीदेवी यांना त्या ऑनस्क्रीन कुठे जाड तर दिसत नाही ना, त्या चांगल्या दिसतायतं ना याची सतत काळजी असायची. एवढंच नाबी तर त्यांना कमी रक्तदाबाचा त्रासही होता. त्यामुळेच त्यांना वारंवार चक्क येत असे . एकदा तर श्रीदेवी सेटवर बेशुद्ध पडल्या होत्या. श्रीदेवी या इतक्या सुंदर होत्या की त्यांना पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतं. पण त्यांचं सौंदर्य टिकवण्याचं रहस्य हे अत्यंत धक्कादायक होतं.
श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांना मिळालेली वागणूक
दरम्यान श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक वेगवेगळ्या चर्चा करण्यात आल्या. पती बोनी कपूर यांच्यावरही बरेच आरोप आणि संशय घेण्यात आला. त्याबद्दलही बोनी कपूर यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले की, ‘तिचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. तो अपघाती मृत्यू होता. मी याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला होता कारण माझी चौकशी केली गेली तेव्हा मी सुमारे 24 किंवा 48 तास याबद्दल बोललो होतो. खरं तर, अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना हे करावे लागले कारण भारतीय माध्यमांचा खूप दबाव होता आणि त्यांना यात कोणताही गैरप्रकार आढळून आला नव्हता. मी लाय डिटेक्टर सह इतर अनेक चाचण्यांना सामोरं गेलो. अर्थातच, त्यानंतर आलेल्या अहवालात श्रीदेवीचा मृत्यू अपघाती असल्याचं स्पष्ट झालं’.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List