रणवीर अलाहाबादियाने अखेर मागितली माफी; अश्लीलतेला प्रोत्साहन,शोवर मुंबई पोलिसांची कारवाई
‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो गेल्या अनेक दिवसांपासून वादात आहे. शिवाय या शोबद्दल सोशल मीडियावरही नेहमीच टीक होत असते. त्यात गेस्ट म्हणून या शोचा भाग झालेला युट्यूबर रणवीर अलाहाबादियाचा हा चांगलाच चर्चेत आला असून त्याने शोमध्ये आई-वडिलांच्या नात्यावरून विचारलेल्या वादग्रस्त प्रश्नामुळे त्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. मात्र आता याबद्दल रणवीर अलाहाबादियाने माफी मागितली आहे.
रणवीरने शेअर केला माफीचा व्हिडिओ
रणवीरने त्याच्या माफीचा व्हिडिओ एक्सवर शेअरही केला आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करत माफी मागितली आहे. रणवीर अलाहाबादियाचा अलीकडेच कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये दिसला, जिथे त्याने आई-वडिलांच्या नात्यावरून खूप आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली.
“माझी टिप्पणी बरोबर नव्हती”….
याबाबत अखेर रणवीर अलाहाबादियाने माफी मागितली आहे. एक्सवर व्हिडिओ शेअर करताना रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “इंडियाज गॉट लेटेंटमध्ये मी जे बोललो होतो, ते मला म्हणायला नको होतं. मला माफ करा.” यासोबतच, तो व्हिडिओमध्ये म्हणाला, “माझी टिप्पणी बरोबर नव्हती, आणि ती मजेदारही नव्हती, मी विनोदात तज्ञ नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी इथे आलो आहे. तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं होतं की मला माझा प्लॅटफॉर्म अशा प्रकारे वापरायचा आहे का? तर नाही, मला तो अशा प्रकारे अजिबात वापरायचा नाहीये. मी जे बोललो त्यासाठी मी कोणतेही निमित्त देणार नाही, मी फक्त तुमची सर्वांची माफी मागतो.मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल.”
वादग्रस्त क्लिप काढून टाकण्यास सांगितले
रणवीर पुढे म्हणाला की “कुटुंब ही अशी गोष्ट आहे ज्याचा मी कधीही अपमान करू इच्छित नाही. या संपूर्ण प्रकरणातून मला जे शिकायला मिळाले ते म्हणजे या प्लॅटफॉर्मचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करणे आवश्यक आहे.” असं म्हणत त्याने त्याची चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच त्याने वचन दिले की तो यापुढे अशी चूक पुन्हा करणार नाही. यासोबतच, रणवीरने सांगितले की त्याने शोच्या निर्मात्यांना व्हिडिओमधून वादग्रस्त क्लिप काढून टाकण्यास सांगितले आहे.
I shouldn’t have said what I said on India’s got latent. I’m sorry. pic.twitter.com/BaLEx5J0kd
— Ranveer Allahbadia (@BeerBicepsGuy) February 10, 2025
दिल्लीहून मुंबईला तक्रार दाखल
रणवीर आणि समय आणि शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांविरुद्ध प्रथम मुंबईत आणि नंतर दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली. दिल्लीतील एका वकिलाने तर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोविरुद्ध माहिती आणि प्रसारण मंत्रालयात तक्रार दाखल केली आणि शोवर बंदी घालण्याची मागणी केली.
शोवर मुंबई पोलिसांची कारवाई
दरम्यान या शोवर मुंबई पोलिसांनीही कारवाई केली आहे. मुंबई खार वेस्ट परिसरातील दि हॅबिटेट इमारतीचा पहिला मजल्यावर पोलिसांची चौकशी सुरु आहे. इमारतीचे मालक त्याचबरोबर इंडियाज गॉट लैटेंट’ शोचे काही सदस्य कर्मचारी यांचीही चौकशी सुरु आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये झालेल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान मुंबई पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे या शोच्या पॅनेल सदस्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. शोमध्ये कायम अभद्र भाषा वापरली जाते आणि हा शो अश्लीलतेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत या शोवर आक्षेप घेण्यात आला असून याविरोधात पोलिसांची कारवाई केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List