‘तिच्यापेक्षा तंबाखू-दारू बरी’, फिटनेस फ्रिक नागा चैतन्यच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
साउथ सुपरस्टार नागा चैतन्य 'थांडेल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात सर्वांची लाडकी अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे.
एका पॉडकास्टमध्ये नागा चैतन्यने फिटनेसबद्दलचे आपले विचार मांडले. नागाने रॉ टॉक्स विथ व्हीके पॉडकास्टवर बोलताना त्याच्या फिटनेसबाबत सांगितलं.
नागा चैतन्य फिटनेस फ्रिक आहे. फिटनेसबद्दल बोलताना नागा असं काही बोलून गेला की सगळ्यांच्याच आश्चर्य वाटलं.नागाने त्याच्या फिटनेससंदर्भात बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वजणच हैराण झाले.
पुढे नागा चैतन्य म्हणाला की, "दारू चांगली, तंबाखू चांगली, काहीही चांगले. पण साखर नाही." नागा चैतन्याच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. नागा चैतन्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
तसेच नागा चैतन्य पुढे म्हणाला, "कृपया माझं बोलणं कोट करू नका, म्हणजेच यावर रील बनवू नका. माझा असा विश्वास आहे की साखरेमुळे आपल्याला कॅन्सर, मधुमेह आणि इतर अनेक समस्या उद्भवतात ज्या जीवघेण्या आहेत."
"मी याबाबत खूप जागरूक आहे. मी खूप कमी साखर खातो, ते ही फक्त माझ्या चीट डेच्या दिवसात", असंही नागा चैतन्यने सांगितलं.
सारखेपेक्षा दारू, तंबाखू चांगले हे नागाने जरी मस्करीत म्हटलं असलं तरी सोशल मीडियावर त्याच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List