क्लिक न करताही अनेकांचे व्हॉट्सअ‍ॅप झाले हॅक, जगभरात स्पायवेयरचा हल्ला

क्लिक न करताही अनेकांचे व्हॉट्सअ‍ॅप झाले हॅक, जगभरात स्पायवेयरचा हल्ला

जगभरातील अनेक देशांमधील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सवर स्पायवेयर हल्ला झाला आहे. इटलीमध्ये सात ते आठ युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाले. त्यानंतर इटलीने या संदर्भात तपास करायला सुरुवात केली आहे. तपासातून असं दिसून आलंय की, पॅरॉगॉन्स सोल्युशन या इस्रायलच्या सर्विलान्स कंपनीशी निगडीत स्पायवेयरचा वापर करून  पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सिव्हील सोसायटी सदस्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे, यासाठी झिरो क्लिक हॅकचा वापर करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपवर हॅकर्सचा हल्ला झाल्याच्या वृत्ताला मेटा कंपनीने दुजोरा दिला आहे. मेटाने इटलीच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजेन्सीलाही अलर्ट केले आहे. स्पायवेयरचा उपयोग अनेक युजर्सवर व्यक्तिगतरीत्या  झाल्याचेही समजते.

जगभरातील सुमारे 24 देशांतील सुमारे 90 युजर्सला लक्ष्य केल्याचे समजतंय. दरम्यान, व्हॉट्सअॅप वापरताना यूजर्संनी नेहमी अलर्ट असायला हवे. व्हॉट्सअॅपवर आलेले ओटीपी आणि व्हेरिफिकेशन कोड कधीच कोणाला शेअर करू नका. अज्ञांतानी पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. व्हॉट्सअॅपवरील टू-स्टेप व्हेरिफिकेशन पीन मजबूत ठेवावा. अॅपला नेहमी अपडेट करणे आवश्यक आहे.

झीरो क्लिक हल्ला म्हणजे काय?

युजर्सचे व्हॉट्सअॅप हॅक करण्यासाठी पॅरागॉन कंपनीच्या स्पायवेयरचा वापर करण्यात आला. याचा अर्थ युजरने कोणत्याही लिंकवर क्लिक न करताही त्याचे व्हॉट्सअॅप हॅक केले गेले. झिरो क्लिक अटॅक झाल्याने हॅकर्स कोणत्याही अडथळ्याशिवाय युजर्सच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप वापरू शकतात. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या कार्यालयाने या घटनेचा तीव्र निषेध केलाय. ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. झिरो क्लिक अटॅक कोणावर झालाय, याची माहिती गोपनीय ठेवण्यात आलीय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

युट्युबर रणवीर अलाहाबादिया याचा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या, राज्यपालाकडे कुणी केली मागणी ? युट्युबर रणवीर अलाहाबादिया याचा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या, राज्यपालाकडे कुणी केली मागणी ?
युट्युबर रणवीर अलाहाबादिया याने समय रैना याच्या इंडियाज गॉट लेटेंट ( Indias Got Latent ) या ब्लॅक कॉमेडी शोमध्ये पालकांविषयी...
‘एकनाथ शिंदे डॉक्टर ते ऑपरेशन कसं करतात हे राऊतांना माहितीये’ शिवसेनेच्या नेत्याचा खोचक टोला
कर्नाटकात जाणाऱ्या एसटीच्या बसेसबाबत महामंडळाचा मोठा निर्णय, काय झाले पाहा ?
11 दिवसांत 47 चित्रपट साइन करणारा अभिनेता, ज्याच्या एका चुकीमुळे शाहरुख खान बनला रातोरात स्टार, अभिनेत्याला आजही पश्चाताप
दररोज थोडं थोडं डार्क चॉकलेट खाल्लं तर? फायदे जाणून विश्वास बसणार नाही; लगेचच डाएटमध्ये समावेश कराल
हेच काय गुजरात मॉडेल? राज्यावर 3.77 लाख कोटींचा कर्जाचा बोजा; दरडोई 66 हजारांचा भार
Ratnagiri News – लोटे वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक्समध्ये वायू गळती, एका कामगाराला गॅसची बाधा