MPSC Exam – संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यासाठी 40 लाख रुपयांची मागणी, परीक्षेला तात्काळ स्थगिती द्यावी; विद्यार्थ्यांची मागणी

MPSC Exam – संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यासाठी 40 लाख रुपयांची मागणी, परीक्षेला तात्काळ स्थगिती द्यावी; विद्यार्थ्यांची मागणी

संयुक्त गट ‘ब’च्या परीक्षेची आम्ही परीक्षेपूर्वी एक दिवस अगोदर प्रश्नपत्रिका देतो, असे सांगून 40 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याची मागणी एका ऑडिओ क्लिप या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे तीन दिवसांवर येवून ठेपलेली संयुक्त पूर्व परीक्षा तात्काळ पुढे ढकलून या व्हायरल ऑडिओ क्लिपची आयोगाने सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिप सोशल मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी कथित विद्यार्थ्याला एका एजंटने कॉल केला. कथित विद्यार्थ्याने आपण बोलताय कोण? रात्र झाली. किती वाजलेत? यावेळी दूरध्वनीवरून एजंटने तुमची डॉक्युमेंट आम्हांला प्राप्त झाली आहे. परीक्षेपूवी एक दिवस अगोदर आम्ही तुम्हाला पेपर देतो. त्यानंतर आम्हाला तुम्ही 40 लाख रुपये द्या. तुम्ही इच्छूक आहात का? ते आम्हांला सांगा. यावर कथित उमेदवाराने, ‘रिस्क तर नाही ना?’, असा सवाल उपस्थित करताच एजंटने तुम्ही कोणाला सांगू नका, असे सांगितले. तुम्हाला आम्ही स्वतःहून पेपर देत असल्याचे सांगितले. तुमचे सर्व फायनल झाले की, आम्हाला पैसे पाहिजे.

कथित उमेदवाराने एजंटच्या नावाची मागणी करताच दादा नाव सांगू शकत नसल्याचे एजंटने सांगितले. तसेच आम्ही तुम्हाला सर्व काही देत आहे. जोपर्यंत तुम्ही लागत नाही तोपर्यंत आम्हाला पैसे नकोत. यावर कथित उमेदवाराने एजंटला तुम्ही माझे मित्र तर नाही ना?, अशी विचारणा करताच आपण कोणी मित्र नसल्याचे सांगितले. या गंभीर प्रकरणाची राज्य शासन आणि एमपीएससी आयोगाने दखल घेऊन 2 फेब्रुवारी रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा तात्काळ पुढे ढकलून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सहकार दिंडीचे जल्लोषात स्वागत, सहकाराच्या सक्षमीकरणासाठी राज्य सहकारी बँकेकडून दहा लाखांची मदत सहकार दिंडीचे जल्लोषात स्वागत, सहकाराच्या सक्षमीकरणासाठी राज्य सहकारी बँकेकडून दहा लाखांची मदत
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकारी पतसंस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीने आयोजित सहकार दिंडीचे स्वागत आज महाराष्ट्र राज्य...
थोडक्यात बातम्या – विधी सीईटीच्या परीक्षेत बदल
दादरमधील मीनाताई ठाकरे फुलबाजारात महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई विभाग क्र. 8 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर
Mahakumbh 2025 Stampede – ‘सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा’, शंकराचार्य यांचं वक्तव्य
Swara Bhasker चे X अकाऊंट कायमचे सस्पेंड, महात्मा गांधींवर पोस्ट केल्याने झाली कारवाई?
Nitish Kumar Viral Video – महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर नितीश कुमार यांनी वाजवल्या टाळ्या, व्हायरल व्हिडीओवर विरोधक संतापले