St Bus Fare Hike एसटीची भाडेवाढ ठरतेय प्रवासी-वाहकांत ‘कळी’चा मुद्दा

एसटी महामंडळाची नवीन भाडेवाढ प्रवासी आणि वाहकांमध्ये ‘कळी’चा मुद्दा बनली आहे. राज्यभरात दररोज कुठे ना कुठे बाचाबाची, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. 11 रुपये, 21 रुपये, 31 रुपये अशा प्रकारे विचित्र तिकीट दर निश्चित केल्याने वादाला तोंड फुटत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने राज्य परिवहन प्राधिकरणाकडे भाडेवाढीचा फेरप्रस्ताव सादर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्याच्या कानाकोपऱयात सेवा देणाऱया एसटी महामंडळाची आर्थिक घडी सावरण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करण्याऐवजी महायुती सरकारने जनतेच्याच खिशात हात घातला आहे. एसटीच्या तिकीट दरात तब्बल 14.95 टक्क्यांची मोठी भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीवरून महायुती सरकारविरोधात राज्यभर संतापाचा भडका उडाला आहे. याचदरम्यान नवीन भाडेवाढीमुळे निश्चित झालेले सुधारित तिकीट दर प्रवासी व वाहकांमध्ये वादाला निमंत्रण देत आहेत. सध्या सुटय़ा पैशांचे व्यवहार जवळपास बंद झाले आहेत. एटीएममधून शंभर, दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा निघत असल्याने कोणताही प्रवासी तिकिटासाठी सुटे पैसे देत नाही. अशा गोष्टींचा सारासार विचार न करताच एक रुपयाच्या पटीत एसटीची भाडेवाढ केली आहे. त्यामुळे आधीच भाडेवाढीवर प्रवाशांचा पारा चढलेला असताना सुटय़ा पैशांवरून होणाऱया वादाची त्यात भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाने भाडेवाढ सूत्रात तत्काळ बदल करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे फेरप्रस्ताव सादर करावा, अशी मागणी केली जात आहे.

आर्थिक तोटय़ाचे तकलादू कारण

यापूर्वी 16 जून 2018 आणि 26 ऑक्टोबर 2021 रोजी पाच रुपयांच्या पटीत भाडेवाढ केली गेली होती. त्याच सूत्रानुसार एसटीने भाडेवाढीचा फेरप्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे सादर करावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. नवीन भाडेवाढ पाच रुपयांच्या पटीत असावी, असा प्रस्ताव एसटीने यापूर्वीच पाठवला होता. त्याला प्राधिकरणातील अधिकाऱयांनी केराची टोपली दाखवली. आर्थिक तोटा होण्याचे तकलादू कारण देत एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ केली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुणे-सातारा महामार्गाचा आणखी तीन महिने खड्डय़ातून प्रवास, काम पूर्ण करण्यासाठी  मे 2025 ची डेडलाइन पुणे-सातारा महामार्गाचा आणखी तीन महिने खड्डय़ातून प्रवास, काम पूर्ण करण्यासाठी मे 2025 ची डेडलाइन
पुणे-सातारा महामार्गाचे काम 2010 सालापासून सुरू असून अद्याप पूर्ण न झाल्याने वाहनचालकांना वाहतूककोंडी तसेच खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे....
यूकेमध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष
अतिशी विरोधी पक्षनेत्या
कोकाटे, मुंडे आणि बँक बुडव्यांचे रक्षण करणे हेच भाजपचे हिंदुत्व आहे काय? उद्धव ठाकरे यांनी डागली तोफ
साहित्य संमेलनात राजकीय चिखलफेक! सारस्वतांच्या व्यासपीठावर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण, नीलम गोऱ्हे यांची नमकहरामी… महाराष्ट्रात संतप्त पडसाद, शिवसेनेच्या रणरागिणींची पुण्यात घरावर धडक; पोस्टर्स पायी तुडवले
संमेलनाच्या मंचावर राजकारणी का? महादजी शिंदे स्वाभिमानी माणूस; हा पुरस्कार एकनाथ शिंदेंना कसा? विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक राणा यांचा हल्ला
विज्ञान – रंजन – महावणवा