उद्धव ठाकरेंकडून ‘एकला चलो रे’चा नारा, नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून महापालिकेची तयारी केली जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वत: एकला चलो रे चा नारा दिला आहे. नुकत्याच अंधेरीत केलेल्या भाषणावेळी त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
आमचं हिंदुत्व राष्ट्रवादी आहे. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. आमचं हिंदुत्व गोमूत्रधारी नाही. अमित शाह यांनी त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या सांगावी. आमच्याशी युती तोडली तेव्हा आम्ही हिंदूत्व नव्हतो. प्रबोधनकाराचा नातू आणि बाळासाहेबांचा मुलगा हिंदूत्ववादी नसेल. हिंदुत्व सोडू शकेल. मी हिंदू अभिमानी आहे. तसाच मराठीचा कडवट अभिमानी आहे. प्रेमाने वागाल तर उचलून देऊ. कपटाने वागाल तर उचलून आपटू. आम्ही संघ किंवा भाजपवाले नाही की मरायला तुम्ही आणि सर्व झाल्यावर मिरवायाल आम्ही अशी शिवसेना नाही
बहुमताचं सरकार आलं कसं या धक्क्यातून ते आले नाही. सरकार आलं आणि नंतर पालकमंत्र्यावरून वाद सुरू. टायर जाळणे सुरू. लाज असेल तर तुम्ही निघून जा. उद्धव ठाकरेंची जागा ठरवताना तुमची जागा काय होती आणि त्यातून तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला कसं काढलं हे पाहा.
मी मैदानात पाठ दाखवणारा नाही. मी मैदान सोडेल तर जिंकून सोडेल. हारून तर गद्दारांच्या हातून सोडणार नाही. मी जिद्दीने उभा आहे. जे जात आहेत. रोज उद्धव ठाकरेंना धक्का. एवढे भाडोत्री घेतले तरी तुमची भूमिका बदलत नाही. वामनराव महाडिक यांच्या भाषेत विकली जाते ते विष्ठा असते, उरते ती निष्ठा असते.
सर्वांचं मत आहे. एकटे लढा. ताकद आहे? अमित शाहांना जागा दाखवणार आहात. ठिक आहे. अजून निवडणूक जाहीर झाली नाही. तुमची जिद्द आणि तयारी बघू द्या. ज्या भ्रमात राहिलो त्यातून बाहेर या. जेव्हा आपली खात्री पटेल आपली तयारी झाली. तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेईल. यावेळी मला सूड उगवून पाहिजे. जो मराठी मातीवर वार करतो, मराठी आईच्या कुशीवर वार करतो, तो गद्दार दिसता कामा नये. शपथ घेऊन सांगत असाल तेव्हा वेळ येईल तेव्हा एकटा लढल्याशिवाय राहणार नाही. अमित शाहांना सांगतो जास्त नादी लागू नका. जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला जाल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List