खोटी माहिती दिल्याने गमावली नोकरी, न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार
खोटी माहिती दिल्याने एका महिलेने अनुकंपा नोकरी गमावली. उच्च न्यायालयाने या महिलेला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला नाही. या महिलेला बडतर्फ करण्याच्या सोलापूर महापालिकेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.
या महिलेचे वडील सोलापूर महापालिकेत चालक पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर महिलेने अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. त्यास आईने ना हरकत दिली. महिलेला अनुकंपा नोकरी मिळाली. ही महिला विवाहित आहे. अनुकंपा नोकरी घेताना तिने अविवाहित असल्याचे प्रतिज्ञापत्रावर सांगितले, अशी तक्रार महापालिकेकडे करण्यात आली. त्याची दखल घेत पालिकेने या महिलेला सेवेतून बडतर्फ केले.
पालिकेच्या कारवाईविरोधात महिलेने याचिका दाखल केली. न्या. भारती डांगरे व न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली असता न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List