BB 18 Finale Chum Darang : मॉडलिंग ते ‘कॅफे चू’… कोण आहे चुम दरांग?
बिग बॉस 18 चा फिनाले सुरू झाला आहे. थोड्याच वेळात कलर्स वाहिनीवर हा फिनाले दाखवला जाणार आहे. आज रात्री सलमान खान टॉप फायनेलिस्ट कंटेस्टेंटमधून एकाला बिग बॉसचा अंतिम विजेता म्हणून घोषित करणार आहे. या फिनालेमधील प्रत्येक स्पर्धक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे.
पण यातूल चुम दरांगची कहाणी काही वेगळीच आहे. कोणताही संघर्ष न करता, आपला खेळ करत चुम अंतिम फेरीपर्यंत पोहोचली आहे. पण तिथे तिला नशीबाने साथ दिली नाही. कारण नुकत्याच जाहीर झालेल्या बिग बॉसच्या एका यादीनुसार चुम ही टॉप 6 मधून बाहेर पडली आहे. पण ही चुम दरांग नक्की आहे तरी कोण? त्यावर एक प्रकाश टाकुया.
16 ऑक्टोबर 1991 मध्ये अरुणाचल प्रदेशच्या पासीघाटमध्ये चुम दरांगचा जन्म झाला होता. वयाच्या 16 साल वर्षी म्हणजे 2007मध्ये तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. 2010मध्ये तिने मिस ऑल अरुणाचल प्रदेश स्टुडेंट यूनियनचा किताब पटकावला होता. त्यानंतर तिने देशातील अनेक ब्युटी कॉन्टेस्टमध्ये तिने भाग घेतला होता. चुम दरांग मिस नॉर्थ ईस्ट दिवा 2014ची फायनलिस्ट होती. 015मध्ये ती मिस हिमालयची सेकंड रनर अप होती.
पुरस्कारांची खैरात
त्यानंतर 2016मध्ये तिने मिस अर्थ इंडिया 2016मध्ये भाग घेतला होता. यात तिला मिस अर्थ इंडिया वॉटरचा किताब मिळाला. 2017मध्ये चुमने मिस आशिया वर्ल्डमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. यात 24 देशांच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत चुमने पाचवं स्थान मिळवलं होतं. तिला मिस इंटरनेट सबटायटल मिळालं होतं. 2017मध्ये चुमने मिस टियारा इंडिया इंटरनॅशनलमध्ये विजय मिळवला होता. त्यासोबतच तिने ‘मिस स्पोर्ट गियर’ आणि‘मिस बेस्ट नेशनल कॉस्ट्यूम’ हे दोन्ही पुरस्कार मिळवलं होते.
अभिनयाकडे मोर्चा
चुम दरांगने तिच्या अभिनयाची सुरूवात ओटीटीवरून केली. अमेझॉन प्राईम व्हिडिओवर आलेल्या ‘पाताल लोक’ या वेब सीरिजमधून तिने डेब्यू केलं होतं. तर ‘बधाई हो’ या हिंदी सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. त्यात तिने भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव सारख्या बड्या कलाकारांसोबत काम केलं होत. त्यानंतर चुमचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा आला होता. त्यात ती आलिया भट्ट सोबत दिसली होती.
व्यवसाय काय?
चुमने अभिनया व्यतिरिक्त बिझनेसही सुरू केला आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट या तिच्या होम टाऊनमध्ये तिने ‘Cafe Chu’ सुरू केलं होतं. अरुणाचल प्रदेशचा चेहरा म्हणून ती सामाजिक कार्यही करते. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विटरवरून चुमला पाठबळ देण्याचं आवाहन केलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List