पुण्यात भाजपच्या इच्छेला दिला धक्का, पालकमंत्रिपदी अजित पवार यांचा झेंडा

पुण्यात भाजपच्या इच्छेला दिला धक्का, पालकमंत्रिपदी अजित पवार यांचा झेंडा

पुणे जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक नऊ आमदार असल्याने पुण्याच्या पालकमंत्रिपदावर भाजपने दावा केला होता; परंतु त्यांच्या इच्छेला धक्का देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर आपला झेंडा कायम ठेवला आहे. पुण्याबरोबरच अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचेदेखील जबाबदारी घेतली आहे.

पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 आमदारांपैकी नऊ आमदार भाजपचे आहेत. त्याखालोखाल अजित पवार गटाचे आठ आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी सर्वाधिक आमदार असल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर होते; परंतु महायुतीच्या पालकमंत्रिपदाच्या जागावाटपामध्ये पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांनी स्वतःकडे घेण्यात यश मिळविले आहे.

चंद्रकांत पाटील यांना सांगलीचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे. माधुरी मिसाळ यांच्याकडे कोल्हापूरच्या सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. पुण्याचा जिल्हा नियोजन समितीचा आराखडा सुमारे साडेबाराशे कोटींचा आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व खात्यांच्या जिल्हा परिषदेबरोबरच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस आणि संबंधित खात्यांची बैठक घेण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना आहेत. पालकमंत्रिपद ताब्यात घेऊन अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यावर आपलेच वर्चस्व राहणार, हे सिद्ध केले आहे.

महायुतीत निधीवाटपाचे सूत्र कसे राहणार?

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहे. अशा वेळी जिल्हा नियोजन समितीमधील विकासकामे, तसेच शहरातील प्रमुख प्रकल्पांसाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. निधीवाटप करताना महायुतीमध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार हे स्वतःच्या पक्षाला अधिक निधी पदरात पाडून घेतात. निधी वाटपावरून महायुतीमधील कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्यामुळे येत्या पाच वर्षांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपाचे धोरण महायुतीमध्ये कसे राहणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आम्ही राज ठाकरेंच्या पुढच्या वाटचालीवर… संजय राऊत यांचं मोठं विधान काय? आम्ही राज ठाकरेंच्या पुढच्या वाटचालीवर… संजय राऊत यांचं मोठं विधान काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारल ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला. या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारला घेरलं. त्यामुळे राज ठाकरे...
औषध कसलं हे तर विष, दारूमुळे कर्करोग? थेट हायकोर्टाचा ठोठावला दरवाजा, हा दावा वाचाच
सैफ अली खान हल्लाप्रकरणी मोठी अपडेट, हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपीचं सत्य अखेर समोर
‘सैराट’ फेम तानाजी गलगुंडेच्या नव्या लूकची चर्चा; मोनालिसा बागलसोबत जमणार जोडी
सासरच्यांनी करीयर केलं उद्ध्वस्त, नवऱ्याने केली फसवणूक’, खडतर होतं गायिकेचं खासगी आयुष्य
एलन मस्क यांचे नोबेलसाठी नामांकन
जितक्या नोटा मोजाल, तितक्या घरी घेऊन जा; चीनमधील कंपनीची अजब ऑफर