पुणेकरांमध्ये वाढतो आहे मानसिक आजारांचा विळखा

पुणेकरांमध्ये वाढतो आहे मानसिक आजारांचा विळखा

कामाचा वाढता ताण, कामाच्या डेडलाईनचे टेन्शन, नोकरी सांभाळताना कुटुंबीयांना वेळ देता न येणे, लांबचा प्रवास, रहदारी, शिक्षणाचा अतिरिक्त ताण यासारख्या समस्यांमुळे पुणेकरांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. देशात सर्वाधिक मानसिक समस्यांचा सामना पुणेकरांना कारावा लागत असून यामध्ये 18 ते 25 या वयोगटातील तरुणांची संख्या अधिक असल्याचे एका संस्थेच्या विश्लेषण अहवालातून समोर आले आहे.

ऐतिहासिक शहर, सायकलींचे शहर, सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा लौकिक आहे. आर्थिक आणि औद्योगिक वाढीच्या दृष्टीने पुणे हे महत्त्वाचे शहर बनले आहे. मागील काही वर्षांमध्ये पुणे हे माहिती आणि तंत्रज्ञानाची नगरी म्हणजेच आयटी हब म्हणून उदयास आले आहे. विविध क्षेत्रात पुण्याचा लौकिक वाढत असताना दुसरीकडे पुण्याचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत आहे. स्वाईन फ्लू, कोरोना, चिकनगुनिया, डेंग्यू, झिकासारख्या आजारांचे पुणे हे हॉटस्पॉट बनले होते. त्यातच आता देशात सर्वाधिक पुणेकर मानसिक आरोग्याच्या विळख्यात अडकत असल्याचे समोर आले आहे.

मानसिक आरोग्य सेवा प्रदान करत असलेल्या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एम्पॉवर संस्थेच्या हेल्पलाइन नंबरवर मानसिक आरोग्याचे निराकरण करण्यासाठी संपूर्ण देशभरातून येणाऱ्या कॉल्समध्ये सर्वाधिक कॉल्स हे पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. पुण्यातून येणाऱ्या कॉल्समध्ये 57 टक्के पुरुष, तर 43 टक्के महिलांचा समावेश आहे. राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत पुण्यामध्ये चिंताग्रस्तांचे प्रमाण २६ टक्के असल्याचे आढळले, तर मानसिक आरोग्यावर मदतीसाठी पुण्यातून आलेल्या कॉल्समध्ये 51 टक्के प्रमाण हे 18 ते 25 वयोगटातील तरुणांचे असल्याचेही दिसून आले आहे.

मानसोपचार तज्ज्ञांद्वारे मोफत मार्गदर्शन

एम्पॉवर संस्थेच्या हेल्पलाइन नंबरवर मानसिक आरोग्याच्या समस्येवर मदत मागण्यासाठी देशभरातून कॉल्स असून मानसोपचार तज्ज्ञांद्वारे मोफत त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. या हेल्पलाईनवर दर महिन्याला देशभरातून चार हजारांहून अधिक कॉल्स मदतीसाठी येत आहेत. त्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या कॉल्सची संख्या ९०० ते एक हजाराच्या घरात आहे. त्यात एकट्या पुण्यातून येणाऱ्या कॉल्सची संख्या सहाशेहून अधिक असल्याचे समोर आले आहे.

पुण्यामध्ये शिक्षणावर असलेला भर आणि अत्यंत स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. वाढलेली जागरूकता आणि मानसिक आरोग्याचे सुलभ स्रोत तरुणांसाठी महत्त्वाचे आहेत. वेळेत उपचार मिळाल्यास तरुणांचे मानसिक स्वास्थ्य सुधारू शकते.

– डॉ. स्नेहा आर्य, मानसोपचारतज्ज्ञ एम्पॉवर सेंटर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्री दर आठवड्यात घेणार भाजप मंत्र्यांची क्लास, असे असणार आठवड्याचे वेळापत्रक मुख्यमंत्री दर आठवड्यात घेणार भाजप मंत्र्यांची क्लास, असे असणार आठवड्याचे वेळापत्रक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती घेतल्यापासून झपाट्याने काम सुरु केले आहे. पक्षातील मंत्र्यांनी त्यांनी कामाला लावले आहे. त्यांनी आता...
“स्वत: संन्यासी बनून बिझनेस केला अन्..”; ममता कुलकर्णीवर टीका करणाऱ्या बाबा रामदेव यांना राखी सावंतचं उत्तर
लेकरांचा जीव धोक्यात, एका आई म्हणून…, दिया मिर्झाची थेट फडणवीसांकडे विनंती, व्यथा मांडत म्हणाली..
महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णीला महाकुंभमध्ये मोठा झटका
बापरे..! गालाव्यतिरिक्त शरीराच्या या भांगांमध्ये खळी पडते
काही दिवस मेकअप न केल्यास मिळतील आश्चर्यकारक फायदे, नैसर्गिक ग्लो येण्यासोबतच त्वचा होईल निरोगी
Termeric Benefits: दररोज सकाळी हळदी शॉट्स प्या, रोगप्रतिकारकशक्तीसह मेंदूचे आरोग्य होईल निरोगी….