मोठी बातमी! ‘त्या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत; यादीत तुमचं तर नाव नाहीना?

मोठी बातमी! ‘त्या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत; यादीत तुमचं तर नाव नाहीना?

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. डिसेंबरपर्यंतचे हाप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा हाप्ता कधी मिळणार त्याकडे. त्यासोबतच 2100 रुपयांचा हाप्ता कधीपासून मिळणार असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आता या योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.

नेमकं काय म्हणाल्या तटकरे?   

डिसेंबरचा हाप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. आता 26 जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हाप्ता देखील मिळणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. ही योजना सुरूच राहणार आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ असं अश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलं होतं. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे यावर देखील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या आधी यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि त्यानंतरच्या काळात यावर सकारात्माक विचार होणार आहे, मात्र आता 1500 रुपयांचाच लाभ मिळणार आहे. यासाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितलं की डिसेंबरपर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, अशा महिलांनी लाभ परत केला. ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिला या योजनेतून कमी होतील.  ज्या महिलांचे या योजनेंतर्गत एकापेक्षा अधिक खाती आहेत, त्या महिलांना कमी केलं जाईल. जास्त काही फरक पडणार नाही, मात्र एखादा टक्का महिला योजनेतून कमी होतील असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘खूप आव्हानात्मक दिवस,अजूनही परिस्थिती…,’सैफवरील हल्ल्यानंतर काय म्हणाली करीना ‘खूप आव्हानात्मक दिवस,अजूनही परिस्थिती…,’सैफवरील हल्ल्यानंतर काय म्हणाली करीना
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील राहत्या निवासस्थानी अ‌ज्ञाताने हल्ला केल्यानंतर सैफ अली खानची पत्नी करीना कपूर हीने...
HPV लस मुलांसाठी का महत्वाची? जाणून घ्या
एका चार्जमध्ये मुंबईहून पुणे गाठते, 1 लाख रुपयांत लॉन्च होणार ‘ही’ इलेक्ट्रिक कार
महिंद्राचा ग्राहकांना धक्का, Thar ROXX महागली; जाणून घ्या नवीन किंमत
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होकर्णा येथील शेतकर्‍याने संपवलं जीवन
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नासा आणि इस्त्रो केंद्रांना भेट देणार, 56 विद्यार्थी पात्र
मोठी बातमी! ‘त्या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत; यादीत तुमचं तर नाव नाहीना?