Saif Ali Khan : सैफकडे किती पैसा? बँक बॅलन्सचा आकडा वाचून तुमचे डोळे विस्फारतील
सैफ अली खान बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. फक्त तो चित्रपटांमधूनच कमाई करत नाही, तर बूट-चप्पल यामधूनही तो पैसा कमावतो. सैफ अली खानकडे असलेला पैशाचा आकडा वाचून तुमचे डोळे विस्फारतील.
सैफ अली खान फक्त अभिनेता नाहीय. तो नवाबांच्या कुटुंबातून येतो. चित्रपटात काम करण्याशिवाय त्याचे बरेच व्यवसाय आहेत. त्याबद्दल लोकांना माहित नाही.
काही वर्षांपूर्वी सैफ अली खानने एक व्यवसाय सुरु केलाय. हा व्यवसाय तो वाढवतोय. हा बिझनेस फॅशन क्लोदिंग आणि डिझायनर बूट-चप्पलचा आहे. सैफने 2018 साली हा ब्रांड हाऊस ऑफ पटौदी नावाने सुरु केला होता. त्यानंतर देशातील वेगवेगळ्या शहरात त्याने दुकानं उघडण्यास सुरुवात केली.
त्याच्या या ब्रांडच्या कपड्यांमध्ये आणि बूट-चप्पलांमध्ये नवाबांच्या काळातील झलक दिसून येते. सैफकडे शानदार पटौदी पॅलेस आणि दुसरं भोपाळमध्ये वडिलोपार्जित घर आहे. त्याच्याकडे 5 हजार कोटींची प्रॉपर्टी आहे. पण तो ही संपत्ती आपली चार मुलं सारा, इब्राहिम, तैमूर आणि जेहच्या नावावर करु शकत नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List