एसटीत मद्यधुंद चालकांवर संक्रांत, महामंडळाने सुरु केली झाडाझडती, पाहा काय झाला निर्णय?

एसटीत मद्यधुंद चालकांवर संक्रांत, महामंडळाने सुरु केली झाडाझडती, पाहा काय झाला निर्णय?

एसटी महामंडळाच्या वाहन चालकांना अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेले असते. तसेच वाहतूक क्षेत्रातील इतर वाहनांपेक्षा एसटीचा अपघाताची संख्या अत्यंत कमी आहे. तरीही एसटी महामंडळाने अलिकडे सोशल मीडियावर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन एसटी महामंडळातील सर्व वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रेथ एनालायझर चाचणीत शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण नेमके किती आहे याची इत्यंभूत माहिती मिळत असते. त्यामुळे एसटी चालक आणि वाहकांवर जणू संक्रातच आलेली आहे.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची संख्या ८० हजाराच्या आसपास आहे. यात सर्वाधिक संख्या अर्थात वाहक आणि चालकांचीच आहे. या एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या चालक आणि वाहकांना आता ब्रेथ एनालायझरच्या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या १६ हजार गाड्या असून त्यावर चालक आणि वाहकांची कामगिरी असते. या सर्व वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्यासाठी महामंडळाने खास पथकच नेमले आहे. या तपासणी पथकात सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक, प्रशिक्षण पर्यवेक्षक याचा समावेश करण्यात आला आहे.

एसटी महामंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. १६ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत विभागातील मद्यप्राशन करणाऱ्या संशयित चालक आणि वाहक यांच्या यादीप्रमाणे सर्व चालक आणि वाहकांची तपासणी विशेष पथके नेमुन करण्यात यावी असे एसटी महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. रजेवर असलेल्या किंवा गैरहजर असलेल्या चालक आणि वाहक यांना वगळता इतर सर्व संशयित चालक आणि वाहकांची तपासणी करण्यात यावी असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. तपासणी न झालेल्या चालक आणि वाहकांची तपासणी न होण्याची कारणे देखील नमुद करण्यात यावी असेही या परिपत्रकात म्हटले आहे. या व्यतिरिक्त बसस्थानक, कंट्रोल पॉईंटवरील वाहतूक नियंत्रकांमार्फत लॉग शिट नोंद करताना इतर सर्व चालक वाहकांची तपासणी करण्यात येणार आहे.

वसतीच्या गाड्यांचे चालक निशाण्यावर

विशेषतः मुक्कामी असणारे चालक आणि वाहक यांची प्राधान्याने ब्रेथ एनालायझर तपासणी करण्यात यावी. तसेच या मोहीमेदरम्यान तपासलेल्या सर्व चालक आणि वाहकांच्या नोंदी करण्यात याव्यात. याबाबत एकत्रित अहवाल विभाग नियंत्रक यांच्यामार्फत [email protected] या कार्यालयीन ईमेलवर दि. २२ जानेवारी २०२५ पर्यंत पाठविण्यात याव्यात असे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक ( वाहतूक ) यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पत्रकात दिले आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्लासला दहा आमदारांची दांडी PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्लासला दहा आमदारांची दांडी
PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यात नौदल डॉकयार्ड येथे तीन...
Torres Scam: टोरेस ज्वेलर्स घोटाळ्यात परदेशातून सर्व्हर हाताळणी, हजारो गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला
“तुला काय वाटतं …” प्रत्येक किसनंतर इम्रान हाश्मीने विद्या बालनला एकच प्रश्न विचारून हैराण केलं होतं
कधी अशी… कधी तशी.. महाकुंभमधील मॉडर्न साध्वीचे हॉट फोटो व्हायरल
युजवेंद्र चहल सोबत घटस्फोटाच्या चर्चा, बायको धनश्री वर्मा म्हणाली…
गोविंदाच्या जन्मानंतर आईने घेतला संन्यास, आईने 4 मुलांच्या जन्मानंतर…
नवीन वर्षांत सई ताम्हणकरची नवी सुरुवात; बनतेय पॅराग्लायडिंग पायलट