हृतिक रोशन होता अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर, अभिनेत्याच्या वडिलांनी सांगितली ‘ती’ धक्कादायक घटना
Hrithik Roshan: यंदाच्या वर्षी अभिनेता हृतिक रोशन स्टारर ‘कहो ना प्यार है’ सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक राकेश रोशन दिग्दर्शित सिनेमा अभिनेत्री अमिषा पटेल हिने मुख्य भूमिका साकारली होती. तर हृतिकने याच सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमामुळे हृतिक याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत इतकी वाढ झाली की अंडरवर्ल्डने देखील अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. एका मुलाखतीत राकेश रोशन यांनी यावर मोठा खुलासा केला आहे.
सांगायचं झालं तर, सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट झाल्यानंतर अंडरवर्ल्डच्या लोकांनी त्यांच्याद्वारे निर्मित सिनेमात हृतिकला कास्ट करण्याचा निर्णय घेतला होता. रिपोर्टनुसार, राकेश रोशन म्हणाले, हृतिकला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिल्यानंतर दिवसा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दोन गोळ्या लागलेल्या असताना देखील राकेश रोशन स्वतः ड्राईव्ह करत रुग्णालयात पोहोतले.
या घटनेनंतर अंडरवर्ल्डच्या लोकांना हृतिक याच्यासोबत काम करायचं आहे… याबद्दल राकेश रोशन यांना कळलं. पण त्यांनी यासाठी नकार दिला. यासाठी त्यांनी भयानक परिस्थितीचा देखील सामना करावा लागला. राकेश रोशन म्हणाले, ‘हृतिक त्यांच्यासाठी चित्रपट करू शकतो, असे मी कधीच संकेत दिले नव्हते.” ते पुढे म्हणाले की, हृतिकच्या व्यस्त वेळापत्रकातून तारखी ठरवणं फार कठीण आहे… असं सांगत राकेश रोशन टाळत राहिले.
अशात अंडरवर्ल्डकडून दबाव वाढू लागला. दुसऱ्या शुटिंग रद्द करून आमच्यासोबत काम करण्याचा अंडरवर्ल्डचा हट्ट होता. पण अभिनेत्याच्या वडिलांनी नकार दिला. ‘एकदा मी माझ्या मुलाच्या तारखा इतरत्र दिल्यावर, मी दबावाच्या डावपेचांना बळी पडण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत काही लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. ज्यामुळे गोष्टी क्रिएटिव्ह होत नव्हत्या… म्हणून सिनेमा तयार करणं देखील कठीण झालं होतं…’ असं देखील राकेश रोशन म्हणाले.
हृतिक रोशन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या सिनेमातूनच यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. आजही हृतिकच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. सोशल मीडियावर हृतिकच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. हृतिक फक्त त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत नसतो, तर अभिनेता त्याची पर्सनॅलिटी आणि डान्समुळे देखील कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. अभिनेत्याच्या डान्सचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List