तेजश्री प्रधानच्या जागी नव्या अभिनेत्रीला पाहून नेटकरी नाराज; म्हणाले ‘शोभून दिसत नाहीत..’

तेजश्री प्रधानच्या जागी नव्या अभिनेत्रीला पाहून नेटकरी नाराज; म्हणाले ‘शोभून दिसत नाहीत..’

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वीच मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर आता या मालिकेत नव्या मुक्ताची एण्ट्री झाली आहे. तेजश्रीनंतर यामध्ये मुक्ताची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर मकर संक्रांतीच्या निमित्ताने नवी मुक्ता प्रेक्षकांसमोर आली. अभिनेत्री स्वरदा ठिगळेनं मालिकेत तेजश्रीची जागा घेतली आहे. स्टार प्रवाहच्या मकर संक्रांती विशेष कार्यक्रमात सागर (राज हंचनाळे) आणि नवी मुक्ता (स्वरदा) पहिल्यांदा एकत्र दिसले. या दोघांची जोडी पाहून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या निमित्ताने तेजश्रीने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर काम केलं होतं. यात तिने साकारलेली मुक्ताची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. सागरसोबतची तिची जोडीसुद्धा हिट ठरली होती. मात्र काही कारणास्तव तिने ही मालिका मध्येच सोडली. यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली. म्हणून तेजश्रीच्या जागी नव्या अभिनेत्रीला पाहून काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘तेजश्री प्रधान नाही तर मालिका खास नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे दोघं एकमेकांना शोभून दिसत नाहीत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘तेजश्रीच छान होती पण नवीन कलाकारांचंही स्वागत केलं पाहिजे’, असंही काहींनी लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

तेजश्रीने अचानक मालिका का सोडली याचं नेमकं कारण समोर आलं नाही. मात्र मालिका सोडल्यानंतर तेजश्रीने लिहिलेल्या एका सोशल मीडियावरील पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा झाली. ‘चिअर्स.. कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्त्वाचा आदर करा. कारण तुमच्यासाठी ते इतर कोणीही करणार नाही’, असं तिने त्यात लिहिलं होतं. त्याचसोबत ‘तुम्ही ज्याचे पात्र आहात त्यापेक्षा कमी गोष्टींसाठी अजिबात तडजोड करू नका’, ‘तुम्ही महत्त्वाचे आहात’, ‘देवाकडे तुमच्यासाठी नेहमीच प्लॅन तयार असतो’, ‘हॅपी लाइफ’ असे हॅशटॅग तिने दिले होते. मालिकेतून बाहेर पडल्यानंतर तेजश्रीने ही पोस्ट लिहिल्याने त्यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्लासला दहा आमदारांची दांडी PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्लासला दहा आमदारांची दांडी
PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यात नौदल डॉकयार्ड येथे तीन...
Torres Scam: टोरेस ज्वेलर्स घोटाळ्यात परदेशातून सर्व्हर हाताळणी, हजारो गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला
“तुला काय वाटतं …” प्रत्येक किसनंतर इम्रान हाश्मीने विद्या बालनला एकच प्रश्न विचारून हैराण केलं होतं
कधी अशी… कधी तशी.. महाकुंभमधील मॉडर्न साध्वीचे हॉट फोटो व्हायरल
युजवेंद्र चहल सोबत घटस्फोटाच्या चर्चा, बायको धनश्री वर्मा म्हणाली…
गोविंदाच्या जन्मानंतर आईने घेतला संन्यास, आईने 4 मुलांच्या जन्मानंतर…
नवीन वर्षांत सई ताम्हणकरची नवी सुरुवात; बनतेय पॅराग्लायडिंग पायलट