Indian Navy : आता शत्रुची खैर नाही, आज देशाला मिळणार 3 शक्तीशाली युद्धनौका, खासियत काय?

Indian Navy : आता शत्रुची खैर नाही, आज देशाला मिळणार 3 शक्तीशाली युद्धनौका, खासियत काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याहस्ते आज मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी देशाला समर्पित करण्यात येईल. नौदल ताफ्यात या तीन युद्धनौकांच्या समावेशाने भारताची सागरी सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे. भारताच्या या तीन नवीन युद्धनौका किती शक्तीशाली आहेत आणि त्यांची खासियत काय हे आज या रिपोर्टमधून जाणून घ्या. बदलत्या परिस्थितीत या युद्धनौका भारतासाठी किती आवश्यक आहेत, ते सुद्धा समजून घेऊया.

आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीच्या समावेशाने भारतीय नौदलाची क्षमत कैकपटीने वाढणार आहे. त्याशिवाय हे स्वदेशी निर्मितीच एक उत्तम उदहारण सुद्धा आहे. दोन युद्धनौका आणि पाणबुडी मुंबईच्या माझगाव डॉकमधील शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये (MDL) डिझाइन करुन बनवण्यात आल्या आहेत. यात आयएनएस सूरत ही स्टेल्थ गाइडेड-मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. आयएनएस नीलगिरी प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत बनवण्यात आलेली पहिली स्टेल्थ फ्रिगेट आहे. आयएनएस वाघशीर ही स्कॉर्पिन-क्लास सबमरीन आहे.

तीन वर्षात बांधण्यात आलेली डिस्ट्रॉयर

आयएनएस सूरत ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15बी अंतर्गत बनवण्यात आलेली चौथी आणि शेवटची स्टेल्थ गायडेड-मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. अत्याधुनिक टेक्नोलॉजीने सुसज्ज असलेली ही युद्धनौका शत्रूवर अचूक प्रहार करण्यासाठी सक्षम आहे. आयएनएस सूरतच्या बांधणीची सुरुवात 7 नोव्हेंबर 2019 रोजी झाली. 17 मे 2022 रोजी ही युद्धनौका लॉन्च करण्यात आली. ही भारतीय नौदलाची आतापर्यंतची सर्वात वेगाने निर्मिती करण्यात आलेली स्वदेशी डिस्ट्रॉयर आहे.

आयएनएस सूरतच वैशिष्टय

या युद्धनौकेची लांबी 164 मीटर आहे. स्टलेथ फिचर्स आणि अत्याधुनिक रडारने सुसज्ज असलेली ही युद्धनौका आहे. शत्रुला ही युद्धनौका सापडत नाही.

ही युद्धनौका जमिनीवरुन जमिनीवर आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाइल्स, टॉरपीडो आणि अन्य शस्त्रांनी सुसज्ज आहे.

आयएनएस नीलगिरी ब्लू वॉटर ऑपरेशनमध्ये किंग

आयएनएस नीलगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17ए अंतर्गत बनवण्यात आलेली पहिली स्टेल्थ फ्रिगेट आहे. अत्याधुनिक टेक्नोलॉजी यामध्ये आहे. 28 डिसेंबर 2017 रोजी या युद्धनौकेची बांधणी सुरु झाली. 28 सप्टेंबर 2019 ही युद्धनौका लॉन्च झाली. आयएनएस नीलगिरीच्या समुद्री चाचण्या ऑगस्ट 2024 मध्ये सुरु झाल्या. सर्व चाचण्या या युद्धनौकेने यशस्वीरित्या पूर्ण केल्या.

आयएनएस नीलगिरीच वैशिष्ट्य

ही युद्धनौका 149 मीटर लांब आहे.

यात रडार सिग्नेचर कमी करण्यासाठी विशेष डिजाइनचा उपयोग करण्यात आला आहे.

नीलगिरीला ब्लू वॉटर ऑपरेशनसाठी डिझाइन करण्यात आलं आहे. पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांचा सामना करण्यासाठी ही युद्धनौका सक्षम आहे.

यात सुपरसॉनिक जमिनीवरुन जमिनीवर आणि मीडियम रेंज जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र आहेत.
यात रॅपिड फायर क्लोज-इन वेपन सिस्टम आहेत.

ही युद्धनौका ‘इंटीग्रेटेड प्लेटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम’ने (IPMS) सुसज्ज आहे.

INS वाघशीर

आयएनएस वाघशीर ही भारतीय नौदलाच्या स्कॉर्पीन-क्लास प्रोजेक्ट 75 अंतर्गत निर्मिती करण्यात आलेली सहावी आणि शेवटची डीजेल-इलेक्ट्रिक सबमरीन आहे. वाघशीरला मॉड्यूलर निर्माण तंत्रज्ञानाच्या आधारावर बनवण्यात आलं आहे. त्यामुळे भविष्यात यात नवीन टेक्नोलॉजीचा समावेश करणं सोपं होईल. भारताचं सागरी हित डोळ्यासमोर ठेऊन ही पाणबुडी बनवण्यात आली आहे.

आयएनएस वाघशीरच वैशिष्ट्य

वाघशीर अत्यंत शांतपणे कोणाला काही कळू न देता आपली मोहीम पार पाडू शकते. शत्रुच्या प्रदेशात गुप्तपणे काम करण्यासाठी ही पाणबुडी डिझाइन करण्यात आली आहे.

67 मीटर लांब आणि 1,550 टन वजन आहे.

सबमरीनमध्ये वायर-गायडेड टॉरपीडो, एंटी-शिप मिसाइल आणि अत्याधुनिक सोनार सिस्टम आहे.

ही पाणबुडी समुद्राच्या वर आणि पाण्याच्या खाली टार्गेट उद्धवस्त करण्यासाठी सक्षम आहे.

एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) टेक्नोलॉजीचा भविष्यात यामध्ये समावेश करता येऊ शकतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसटीत मद्यधुंद चालकांवर संक्रांत, महामंडळाने सुरु केली झाडाझडती, पाहा काय झाला निर्णय? एसटीत मद्यधुंद चालकांवर संक्रांत, महामंडळाने सुरु केली झाडाझडती, पाहा काय झाला निर्णय?
एसटी महामंडळाच्या वाहन चालकांना अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेले असते. तसेच वाहतूक क्षेत्रातील इतर वाहनांपेक्षा एसटीचा अपघाताची संख्या अत्यंत कमी आहे....
Bigg Boss 18: फिनालेच्या शर्यतीतून आणखी एक स्पर्धक बाहेर; नाव ऐकून बसेल धक्का!
नानांच्या गावाला जाऊयात; दगडांचा वाडा, शेत, सुसज्ज गोठे, भली मोठी विहीर; नानांच्या शेतघराची सर्वांनाच भुरळ
भारत-बांग्लादेश वादाचा कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’वर निघाला राग
हृतिक रोशन होता अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर, अभिनेत्याच्या वडिलांनी सांगितली ‘ती’ धक्कादायक घटना
तेजश्री प्रधानच्या जागी नव्या अभिनेत्रीला पाहून नेटकरी नाराज; म्हणाले ‘शोभून दिसत नाहीत..’
दात किती मिनिटे घासले पाहिजेत? 90 % लोक करतात ही चूक,त्यामुळे दात लवकर किडतात