जया बच्चन हजारोंसमोर सुनेबद्दल असं काही बोलल्या,ते ऐकून ऐश्वर्याला रडू आलं, व्हिडीओ व्हायरल
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या नात्याबद्दलच्या चर्चा असो किंवा जया बच्चन आणि सून ऐश्वर्या रायमधील नाराजी असो, या सर्वांबद्दलच्या चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून समोर येत आहेत. पण बच्चन कुटुंबातील कोणीही यावर अद्यापपर्यंत तरी कोणतेही भाष्य केले नाही. पण एक प्रसंग असा होता जेव्हा जया बच्चन सर्वांसमोर सून ऐश्वर्याबद्दल असं काही बोलल्या होत्या की तिला रडू कोसळलं होतं.
ऐश्वर्या राय सध्या सतत चर्चेत असते. ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. पण या चर्चांमागील सत्य कोणालाच माहीत नाही. कारण आतापर्यंत अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांनी घटस्फोटाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
सासू-सुनेचं नेमकं काय बिनसलंय?
काही काळापूर्वी ते दोघेही त्यांची मुलगी आराध्याच्या शाळेच्या फंक्शनमध्ये एकत्र दिसले होते, ज्यामुळे या बातम्यांना पूर्णविराम मिळाला होता. मात्र, एक काळ असा होता जेव्हा जया बच्चन आपली सून ऐश्वर्या रायचे कौतुक करताना थकल्या नाहीत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून असे काहीही दिसत नाही. पण एकदा जया बच्चन यांनी ऐश्वर्या रायबद्दल सर्वांसमोर असे काही बोलले होते, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
ऐश्वर्या राय आता क्वचितच तिची सासू जया बच्चन यांच्यासोबत दिसते, आजकाल ती फक्त तिची मुलगी आराध्यासोबत जास्त वेळ घालवताना दिसते. पण एक काळ असा होता की जया बच्चन सर्वांसमोर ऐश्वर्याचे कौतुक करायचे. अशीच एक घटना घडली होती की जेव्हा जया बच्चन या सुनेबद्दल असं काही बोलल्या होत्या जे तिलाही थक्क करणारं होतं.
जया बच्चन ऐश्वर्याबद्दल काय बोलल्या?
सध्या जया बच्चन यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा जुना आहे. त्यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न झाले होते. लग्नानंतर जया बच्चन एका फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला गेल्या होत्या. या शोमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन देखील सहभागी झाले होते. मग त्यांनी आपल्या सुनेबद्दल काही गोष्टी बोलल्या होत्या.
त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जया बच्चन म्हणताना दिसत आहे की, “मी एका सुंदर मुलीची सासू बनले आहे, जिच्याकडे मूल्य आणि प्रतिष्ठा आहे. तिचं हसणं मला खूप आवडतं. बच्चन परिवारात मी तुझे स्वागत करते. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे”
सासूबाईंकडून कौतुक ऐकून ऐश्वर्या रडू लागली
सासूबाईंकडून हे कौतुक ऐकून प्रेक्षकांमध्ये बसलेली ऐश्वर्या राय खूपच भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चनही तिच्यासोबत बसलेला दिसत आहे. मात्र, याआधीही बऱ्याचदा जया बच्चन आपल्या सुनेचे कौतुक करताना दिसल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List