मोठी बातमी! वाल्मिक कराडची प्रकृती खालावली

मोठी बातमी! वाल्मिक कराडची प्रकृती खालावली

अखेर वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र त्याच दरम्यान त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडला मकोका लागताच त्याचा ताबा घेण्यासाठी एसआयटीनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून एसआयटीला वाल्मिक कराडचा ताबा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता उद्या त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. याचदरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्यानं वैद्यकीय चाचणीवेळीच त्याचा ईसीजी काढण्यात आला आहे.

दिवसभरात नेमकं काय घडलं?

आज वाल्मिक कराड याची सीआयडी कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. पुन्हा एकदा त्याच्या सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं मागणी फेटाळत त्याला न्यायालयीन कोठडी दिली. मात्र त्याचवेळी त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर हत्याप्रकरणात त्याचा ताबा घेण्यासाठी एसआयटीनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून एसआयटीला वाल्मिक कराड याचा ताबा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, यावेळी त्याची प्रकृती बिघडल्यानं त्याचा ईसीजी काढण्यात आला आहे.

परळीमध्ये आंदोलन पेटलं

आज सकाळपासूनच वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ परळीमध्ये समर्थकांचं आंदोलन सुरू होतं. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका आंदोलकाला भोवळ आल्याची देखील घटना घडली. मात्र जेव्हा कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्याची बातमी समोर आली तेव्हा कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. बेमुदत परळी बंदची हाक देण्यात आली. टायर जाळून निषेध करण्यात आला. तर एका ठिकाणी बसवर देखील दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आकाला धक्का! कराडला मोक्का!! समर्थकांकडून बंद, हिंसाचार, जाळपोळ… परळीत तणाव आणि भीती आकाला धक्का! कराडला मोक्का!! समर्थकांकडून बंद, हिंसाचार, जाळपोळ… परळीत तणाव आणि भीती
राज्यभरात होणारी छिःथू, देशमुख कुटुंबाने दिलेला निर्वाणीचा इशारा यामुळे खंडणी प्रकरणात कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडला अखेर ‘मकोका’ लावण्यात आला असून...
देशात अनेक गृहमंत्री झाले पण त्यांच्यापैकी कोणी तडीपार झाले नव्हते, शरद पवार यांचा अमित शहांवर हल्ला
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सक्ती, प्रकल्पासाठी 27 हजार एकर जमीन संपादित करणार
कश्मीरमध्ये एलओसीजवळ स्फोट हिंदुस्थानचे सहा जवान जखमी
बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
मुद्दा – ‘एचएमपीव्ही’ला घाबरू नका!
लेख – पास-नापासापेक्षा कौशल्य महत्त्वाचे!