बॉयफ्रेंडसोबतचा MMS लीक अन् राजघराण्यातील या बॉलिवूड अभिनेत्रीचं आयुष्य, करिअर सगळंच उद्ध्वस्त
बॉलिवूडमध्ये अनेकांनी आपली करिअर घडवली तर अनेकांची उद्ध्वस्त झाली. अनेकांना नाव, फेम, प्रसिद्धी मिळाली तर कोणाला फक्त बदनामी. बॉलिवूडमध्ये असेल अनेक कलाकार आहेत ज्यांच्या एका चुकीमुळे त्यांचे करिअर होत्याचं नव्हतं झालं, एका क्षणात त्यांचं आयुष्यच उद्धवस्त झालं अन् त्याची ओळखच पुसली गेली. अशीच एक अभिनेत्री आहे जिच्याबाबतीत अगदी असच घडलं आहे.
या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवत असतानाच एक चूक महागात पडली अन् तिचं करिअरचं संपलं. बरं ही अभिनेत्री हळूहळू नावारुपाला ये होती.तिने अनेक चांगले चित्रपटही दिले. शिवाय ती एका राजघराण्यात जन्माला आलेली मुलगी पण एका गोष्टीने तिला बॉलिवूडपासूनच दूर केलं. ही अभिनेत्री म्हणजे रिया सेन.
‘याद पिया की आने लगी’ मधली ती मुलगी
‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठकचं ‘याद पिया की आने लगी’ हे गाणं आठवत असेलच. याच गाण्यातून रियाला एक नवी ओळख आणि पसंतीही मिळाली.शिवाय या गाण्यातील त्यांचा डान्सही तितकाच फेमस झाला. तेव्हापासून तिला नवीन संधीही मिळत गेल्या. फाल्गुनी पाठकच्या अल्बममध्ये दिसलेली रिया त्यावेळी केवळ 17 वर्षांची होती. 1988 साली हा अल्बम रिलीज झाला होता. तर आज तिचं वय 42 वर्षे आहे.
रियाने बालकलाकार म्हणून अभिनयात पदार्पण केले होते. वयाच्या ५ व्या वर्षीच तिने १९९१ साली ‘विषकन्या’ सिनेमात बालकलाकाराची भूमिका केली होती. यामध्ये तिने तिची आई मूनमून सेनसोबत काम केले होते.रियाने ‘अपना सपना मनी मनी’ सिनेमात काम केले होते. २००१ साली आलेल्या ‘स्टाईल’ या सिनेमामुळे ती प्रसिद्ध झाली होती.
बॉयफ्रेंडसोबतचा MMS व्हिडिओ लीक
पण रिया खरी प्रसिद्धीझोतात आली ती म्हणजे एका MMS व्हिडिओमुळे. तिचा हा व्हिडीओ तिचा बॉयफ्रेंड श्मित पटेलसोबतचा होता. रिया आणि अश्मित पटेलचा एक व्हिडिओ ऑनलाईन लीक झाला होता ज्यात ते दोघे इंटिमेट झाले होते. यानंतर रियाचं करिअरच बर्बाद झालं.
तसंच तिचं आणि अश्मितचं ब्रेकअपही झालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी काही लोकांनी अभिनेत्रीवर आरोप केला होता की रियाने लक्ष वेधण्यासाठी जाणूनबुजून तिचा MMM लीक केल्याचंही म्हटलं गेलं पण दोघांनीही तेव्हा हा व्हिडीओ त्यांचा नसून हा फेक असल्याचं म्हटलं होतं. मात्र आजही त्या व्हिडीओची चर्चा होताना दिसते.
व्हिडीओमुळे तिचं करिअरच संपलं
याच व्हिडीओमुळे तिचं करिअरच संपलं. या कथित एमएमएसने रियाचं संपूर्ण बॉलिवूड करिअर उद्ध्वस्त केलं. त्यानंतर तिने स्वत:ला बॉलिवूडपासून दूर केलं, परंतु तिने कधीही तिची पॉप्युलॅरिटी कमी होऊ दिली नाही. ती
तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच कनेक्टेड असते. रिया दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच बोल्डही आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वयाच्या 42 व्या वर्षीसुद्धा ती एकदम फिट आणि सुंदर दिसते.
रियाचा राजघराण्यात जन्म
रियाचा जन्म हा 24 जानेवारी 1981 रोजी कोलकाता येथे एका राजघराण्यात झाला. तिचे वडील भारत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातून आले आहेत. वडिलांची आई इला देवी या कूछ बिहारीच्या राजकन्या होत्या . तर त्यांची छोटी बहीण गायत्री देवी जयपूरच्या महाराणी होत्या.
तर तिची पणजी या बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या एकुलत्या एक कन्या होत्या.रिया सेनने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली होती.
हिंदीशिवाय ती बंगाली, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये दिसली आहे. मात्र एका MMS लीकने रियाची फिल्मी कारकीर्द ढासळली.अखेर तिने 2017 मध्ये शिवम तिवारीसह लग्नगाठ बांधली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List