रात्री झोपण्यापूर्वी या 7 सवयी बदला, हार्ट अटॅकचा धोका राहणार नाही

रात्री झोपण्यापूर्वी या 7 सवयी बदला, हार्ट अटॅकचा धोका राहणार नाही

हल्ली ज्या प्रकारे लोकांना तसेच लहान मुलांना सुद्धा हृदयविकाराचे झटके येऊ लागले आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करणे खूप कठीण झाले आहे. हसता-खेळता अचानकपणे लोकं हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहे. एवढंच नाही तर आता २०-२२ वयोगटातील तरुण पिढी सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, दरवर्षी 17.9 दशलक्ष लोकं हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावतात. हार्ट अटॅकचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. म्हणजेच जर तुम्ही तुमची जीवनशैली सुधारली तर हृदयाच्या बहुतेक समस्या तुम्ही टाळू शकतो. त्यात तुम्हालाही स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल तर रात्रीच्या वेळी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी अशा सवयी पाळणाऱ्या लोकांना भारी पडू शकते. यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज नाही, रात्री झोपण्यापूर्वी फक्त काही सवयी बदला. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या सवयी बदल्या पाहिजेत.

रात्री झोपण्यापूर्वी करा हे बदल:

रात्री जास्त जड अन्नाचे सेवन कर नका

आपल्यापैकी बरेचजण रात्री अगदी पोटभरून तसेच जड किंवा जास्त अन्न खातात. तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाल्यास तसेच जास्त जड अन्नाचे सेवन करणे टाळा. जेवल्यानंतर कमीत कमी 4 तासांनी झोपा. झोपण्याच्या 2-3 तास आधी हलके जेवण खाण्याचा प्रयत्न करा. अश्याने तुम्हाला हृदयविकाराच्या समस्या उद्भवणार नाही.

मद्यपान करू नका :

अनेकजणांना रात्रीचे मद्यपान करण्याची सवय असते. पण शरीरासाठी दारू हा मोठा शत्रू आहे हे समजून घ्या. हृदयविकार टाळायचा असेल तर रात्री मद्यपान करू नका. किंवा सिगारेट ओढण्याची सवय कधीही लावू नका. तसेच दुपारी 3 नंतर कॅफिन किंवा कॉफी पिऊ नका.

झोपण्यापूर्वी दीर्घ श्वास घेणे

ताणतणावामुळे हृदयविकाराचा झटका जास्त करून येत असतो. यासाठी तणाव कमी करण्यासाठी सकाळी योगा आणि मेडिटेशन करा, पण रात्री झोपण्यापूर्वी स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. ही प्रक्रिया सुमारे 5 मिनिटे करा. या काळात तुम्ही ध्यानही करू शकता.

स्क्रीन टाइम:

झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल, लॅपटॉप बघणे बंद करा. तसेच झोपताना वाय-फायही बंद करा. मोबाइल, टीव्ही किंवा कोणतेही गॅझेट वापरल्यास केवळ तुमच्या हृदयावरच नव्हे तर आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम होईल.

उद्याची तयारी करा :

आधी म्हटल्याप्रमाणे तणाव हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात मोठे कारण आहे. आपल्यापैकी अनेकजण असे आहेत जे रात्री झोपणाच्या आधी दुसऱ्या दिवसाच्या कामाबद्दल विचार करता असतात अशाने तुम्हाला ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे उद्या काय करायचं याची संपूर्ण तयारी आधीच दिवसभरात करून घ्यावे. तसेच दुसऱ्या दिवशी घालणारे कपडे आधीच इस्त्री करा. काय घालायचे, कुठे आणि केव्हा जायचे हे ठरवा. या गोष्टींमुळे पुढच्या दिवसाचे चांगले प्लॅनिंग होईल आणि तुम्हाला ताण येणार नाही.

पाणी खूप महत्वाचे आहे:

रात्रीच्या वेळी तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता पडू नये याची काळजी घ्या. त्यामुळे झोपण्यापूर्वी पाणी प्यावे. तसेच तुम्ही दुधाचे देखील सेवन करू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात सुरेश धस यांचे गंभीर आरोप, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर… महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात सुरेश धस यांचे गंभीर आरोप, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर…
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेमुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे....
घरातील कार्यक्रमात दारू पिऊन धिंगाणा घातल्याने भावानेच दिली भावाच्या हत्येची सुपारी
Delhi Assembly election – अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारसमोर मांडल्या ‘या’ 7 मागण्या, वाचा सविस्तर…
Jalgaon Tragedy – मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; ११ जण ठार
गोड बोलून सही करून घेतली अन्… जवळच्या व्यक्तीनेच केला घात; अभिनेत्रीचे लाखो रुपये घेऊन फरार
डिस्चार्जनंतरही सैफ अली खानला ‘ही’ तीन कामे करता येणार नाहीत; डॉक्टरांनी केलीये सक्त मनाई