वयाच्या 67 वर्षीही ग्लॅमरस दिसते अक्षय कुमारची सासू, काय आहे सुंदर केसांचं रहस्य?
Dimple Kapadia: खिलाडी कुमार म्हणजे अभिनेता अक्षय कुमार याची सासू डिंपल कपाडिया आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेत्री डिंपल कपाडिया आजही चाहत्यांना फिटनेस टिप्स देत असते. वयाच्या 67 व्या वर्षी देखील डिंपल हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. 67 व्या वर्षी देखील डिंपल हिच्या चेहऱ्यावरील तेज कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
एका मुलाखतीत डिंपल कपाडिया हिने निरोगी केसांसाठी काही टिप्स सांगितल्या होत्या. ज्यामुळे आजही डिंपल हिचे केस दाट आहेत. मुलाखतीत डिंपल हिने सांगितलेले उपाय फार सोपे आणि स्वस्त आहेत. दाट आणि चमकदार केस असल्याचं श्रेय डिंपल हिने लहानपणी असलेल्या केसांना तेल लावण्याच्या सवयीला दिलं.
मुलाखतीत डिंपल म्हणाली, ‘केसांना तेल लावल्यामुळे अनेक फायदे होतात. मी रात्रभर केसांना तेल लावून ठेवते. त्यानंतर हेयर पॅकने केसांची मॉलीश करते.’ तर डिंपल हिचं हेयर पॅक कसं आणि कोणतं असेल? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल.
डिंपल कपाडिया हिचा हेयर पॅक
5 अंड्यांमधील सफेद भाग, एक पूर्ण अंड आणि एक केळं… यांचं मिश्रण करून अभिनेत्री हेयर पॅक तयार करते. त्यानंतर हेयर पॅकने केसांची मॉलिश केल्यानंतर 10 ते 30 मिनिटांनंतर केस पाण्यात स्वच्छ धुवायचे… कोमट पाण्यात केस धुतल्यास केस निरोगी राहतात.
डिंपल कपाडिया वापरत असलेलं तेल
डिंपल कायम केसांना तेल लावते. बदाम आणि चंदनचं तेल अभिनेत्री केसांना लावते. ज्यामध्ये जेरेनियम, रोजमेरी आणि लॅवेंडर यांसारखे तेल देखील असतात. शिवाय केस कधीच कलर न करण्याचा सल्ला देखील अभिनेत्रीने चाहत्यांना दिला.
डिंपल कपाडिया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, डिंपल कपाडिया यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आजही डिंपल मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. डिंपल यांनी ‘पठाण’, फिर ‘तू झूठी मैं मक्कार’ आणि ‘सास बहू और फ्लेमिंगो’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. वयाच्या 67 व्या वर्षी देखील डिंपल कपाडिया बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List