“हो मी पॅरालायज्ड झालेय? आता जगू द्या आम्हाला”; आलियाचा संताप, मनातील सगळा राग काढला
आलिया भट नेहमी तिच्या लूक, ड्रेसिंगवरून किंवा तिच्या ब्युटी टीप्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत असते. मात्र काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटशी संबंधित काही व्हिडीओ आणि काही लेख व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आलियाच्या चेहऱ्यासह तिच्या शरीरासंदर्भात वेगवेगळ्या कमेंटस् केल्या जात आहेत.
सर्जरी आणि बोटॉक्सवरून ट्रोल
तसेच तिला सर्जरी आणि बोटॉक्सवरून ट्रोल करण्यात आलं आहे. आलियाने बोटॉक्स केले आहे. पण तिची ट्रीटमेंट चुकीचे झाल्याने चेहरा बिघडला असल्याचं काहींनी म्हटलं, तर काहींनी आलियाच्या चेहऱ्याच्या एका बाजूला लकवा मारला आहे का? अशा कमेंट केल्या आहेत.
या कमेंटमुळे आणि अशा पद्धतीच्या व्हिडीओमुळे आलियाने वैतागून सर्वांना चांगलंच सुनावलं होतं. अखेर आलियाने या सर्व ट्रोलर्संना उत्तर दिले होतं. इन्स्टाग्रामवर तिने एक लांबलचक स्टोरी पोस्ट करत आपला राग, संताप व्यक्त करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. आलियाची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. आजही त्या पोस्टबद्दल तेवढीच चर्चा होते. आलियाने नेमके काय म्हटलं होतं ते पाहुया….
“माझी बोलण्याची पद्धत विचित्र…”
“जे लोक आपल्या शरीरासाठी कॉस्मेटिक करेक्शन किंवा एखाद्या सर्जरीची निवड करतात, त्या लोकांप्रति माझे कोणतेही जजमेंट नाही. शरीर तुमचे आहे तर निर्णय देखील तुमचाच असला पाहिजे. पण वाह! हे तर हास्यास्पद गोष्टीपलिकडील आहे. काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, मी बोटॉक्स केले पण त्याचे चुकीचे परिणाम झाले. (काही क्लिकबेट लेखही चालवले जाताहेत). ज्यामध्ये तुमच्यानुसार असे म्हटले गेलेय की माझे हसणे व्यवस्थित नाही, माझी बोलण्याची पद्धत विचित्र आहे. हे म्हणजे चेहऱ्यावरील बारीकसारीक दोष शोधून काढण्यासारखे आहे. कोणत्याही पुराव्याशिवायच हा अतिशय गंभीर दावा करण्यात आला आहे”. असं म्हणत तिने राग व्यक्त केला होता.
हे सगळं कशासाठी करताय? आलियाचा सवाल
आलिया पुढे म्हणाली, “सर्वात वाईट बाब म्हणजे तुम्ही तरुणांनाही भरकटवत आहात, पण जे तुम्ही केलेले दावे खरे मानत आहेत. का करताय तुम्ही असे? केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी? कारण याने काहीही अर्थ साध्य होत नाही. यासारख्या वायफळ गोष्टींवरुन महिलांप्रति मत तयार केले जाते आणि आमचा चेहरा, शरीर, खासगी आयुष्य इतकंच काय तर आमच्या पार्श्वभागावरून आमच्यावर टीका केली जाते. मायक्रोस्कोपद्वारे निरीक्षण करण्याऐवजी प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आपण स्वीकारले पाहिजे”. असा सवाल आलियाने विचारला होता.
‘जगा आणि जगू द्या…’
शेवटी आलियाने पुढे असे लिहिलंय की, “अतिशय दुःखाची बाब म्हणजे महिलेसाठी एका महिलेकडूनच या सर्व गोष्टी म्हटल्या जात आहेत. ‘जगा आणि जगू द्या’ या धोरणाचे काय झालं? कोणाला स्वतःच्या हिशेबाने जगण्याचा हक्क नाहीय का? आपल्याला एकमेकांचा अपमान करण्याची इतकी सवय लागली आहे की या सर्व गोष्टी अगदी सामान्य वाटतात.” अशी लांब-लचक पोस्ट करत आलियाने संताप व्यक्त केला होता.
काही दिवसांपासून आलिया भटच्या चेहऱ्याच्या हावभावांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात असून तिच्या गालावरील खळीपासून ते तिच्या बोलण्याच्या पद्धतीवर नेटकरी कमेंट आणि चर्चा करताना दिसत असल्याचे पाहून आणि ते जास्त प्रमाणात होत असल्याचे पाहून आलियाने संताप व्यक्त केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List