रवि किशन दुधाने आंघोळ करायचे; अजूनही होती एक विचित्र सवय, वैतागून अनुराग कश्यपने ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून बाहेरचा रस्ता दाखवला
अनुराग कश्यपची आयकॉनिक फिल्म ‘गैंग्स ऑफ वासेपुर’मध्ये अभिनेता आणि राजकारणी असलेले रवि किशन हे देखील भूमिका करणार होते. मात्र ऐनवेळी या चित्रपटामधून त्यांचा पत्ता कट झाला. याच कारण आता स्वत:रवि किशन यांनी सांगितलं आहे. रवि किशन यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुराग कश्यपच्या या चित्रपटाचं बजेट खूप कमी होतं.मात्र या चित्रपटासाठी ते खूप महागडे कलाकार होते.तसेच रवि किशन यांची एक विचित्र सवय देखील होती, त्याचा देखील फटका त्यांना बसला.
रवि किशन यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, मी चित्रपटातून बाहेर पडण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा त्या संदर्भात अनेक अफवा पसरल्या होत्या, मात्र त्या काही सर्वच खऱ्या नव्हत्या, मात्र त्यांच्या एका सवयीबद्दल त्यांनी स्वत:माहिती दिली.त्यांच्या या सवयीचा चित्रपटातून पत्ता कट होण्यामध्ये सर्वात मोठा वाटा होता.
ते म्हणाले की मी दुधाने आंघोळ करायचो, मला दुधाने आंघोळ करण्यात मजा येत होती. कोणीतरी ही गोष्ट अनुराग कश्यपला सांगितली.मी थोडा सनकी देखील आहे, मी सनकी आहे, त्यामुळेच कलाकार आहे. जर मी सामान्य व्यक्ती असतो तर मी कलाकार कधीच होऊ शकलो नसतो, एखाद्या ऑफीसमध्ये आता काम करताना दिसलो असतो. अनुरागने मला सांगितलं की माझ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे बजेट नाहीये, त्यामुळे मला हा चित्रपट सोडावा लागला.
त्या चित्रपटात काम करणारे सर्व लोक माझ्यावर चिडले होते, कारण मी दुधाने आंघोळ करत होतो, गुलाबाच्या पाकळ्यांवर झोपत होतो. असं रवि किशन यांनी म्हटलं आहे.मला वाटतं की मी या चित्रपटात मुख्य अभिनेता होता, आणि एक अभिनेता म्हणून हे सर्व करण गरजेचं आहे. आम्ही हे सर्व नाटक केलं होतं, मला वाटायचं जर मी दुधाने आंघोळ करून गेलो तर चर्चा होईल की मी दुधाने अंघोळ करतो असं रवि किशन यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List