California fire: नुकसान यूपी-बिहारच्या बजेटपेक्षा अधिक, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

California fire: नुकसान यूपी-बिहारच्या बजेटपेक्षा अधिक, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिस जंगलातून सुरू झालेल्या आगीने लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. मंगळवारपासून अर्थात गेल्या 6 दिवसांपासून आग भडकतच असून आतापर्यंत 16 जणांना जीव गमवावा लागला आहे. महासत्ता असलेल्या देशाला चटके देणारी आग अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धोकादायक आणि महागडी आहे. आगीमुळे सुमारे 11 ते 13 लाख कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे. एकूणच हिंदुस्थानातील उत्तर प्रदेश (3 लाख कोटी), बिहार (3 लाख कोटी), मध्य प्रदेश (3 लाख कोटींपेक्षा जास्त) आणि दिल्ली (76 हजार कोटी) या चार राज्यांच्या बजेटपेक्षा अधिक नुकसान या आगीने केले आहे.

जंगली भागातून सुरू झालेल्या आगीने निवासी भागात प्रवेश करून एकच हाहाकार माजवला. तब्बल 40,000 एकर जमीन आगीने लालबुंद झाली आहे. 12 हजारांहून अधिक घरांचे अस्तित्वच संपले आहे.

आग आणखी भडकणार

पुढील काही दिवसांत ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या विनाशाला युद्धाची उपमा दिली. श्वसनाशी संबंधित समस्या असलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. कॅनडा आणि मेक्सिकोनेदेखील कॅलिफोर्नियातील बचाव कार्यात सहभाग घेतला आहे.

सर्व उपाययोजना कुचकामी

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व उपाययोजना कुचकामी ठरत आहेत. शेकडो हेलिकॉप्टर तैनात आहेत. तरीदेखील आगीवर नियंत्रण मिळवताना नाकी नऊ येत आहे. दीड लाखांहून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे. अनेक तज्ञांनी आगीच्या या घटनेसाठी हवामान बदलाला जबाबदार धरले. कारण येथे दशकापासून दुष्काळाची परिस्थिती आहे. मागील वर्षी या परिसरात खूप उष्णता होती. त्यात त्यानंतर पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. हिवाळ्य़ातही पावसाने दडी मारली. सुकलेली झाडे आगीला प्रोत्साहन देत असून वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे आगीने झपाटय़ाने शहराकडे कूच केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वयाच्या 67 वर्षीही ग्लॅमरस दिसते अक्षय कुमारची सासू, काय आहे सुंदर केसांचं रहस्य? वयाच्या 67 वर्षीही ग्लॅमरस दिसते अक्षय कुमारची सासू, काय आहे सुंदर केसांचं रहस्य?
Dimple Kapadia: खिलाडी कुमार म्हणजे अभिनेता अक्षय कुमार याची सासू डिंपल कपाडिया आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेत्री डिंपल कपाडिया आजही...
तर असा दिसतो ज्युनियर कोहली..; विराट-अनुष्काच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल, दिसला चेहरा
करण जोहरला अखेर मिळाला पार्टनर! कोणाला करतोय डेट? ‘ती’ पोस्ट करत म्हणाला…
‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबती, व्यंकटेश डग्गुबतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
‘तारक मेहता..’मधील त्या सीनचा ‘सोनू’च्या मनावर झाला होता परिणाम; इतक्या वर्षांनंतर खुलासा
स्टारडमचा माज, वाढला अहंकार, सर्वकाही संपल्यानंतर मनिषा कोईराला होतोय पश्चाताप
जगभरातून महत्त्वाच्या बातम्या