हिवाळ्यात रोज खा तुळशीची मोजून इतकी पाने, मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
हिवाळाच्या दिवसात थंड हवामान असते. त्याचबरोबर वातावरणातील थंडाव्यामुळे अनेकांना आरोग्याशी संबंधित अनेक आजार होत असतात. या ऋतूत लोकांना अनेकदा सर्दी, खोकला आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचा सामना करावा लागतो. अशावेळी जर तुम्ही तुमच्या दिनक्रमात तुळशीच्या पानांचा समावेश केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. आयुर्वेदात तुळशीला देखील अनन्य साधारण महत्व आहे. अश्यातच औषधी गुणधर्मांमुळे भारतीय कुटुंबांमध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे.
तुळशीचे दररोज मोजून चार पाने खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. विशेषतः हिवाळ्यात तुळशीचे सेवन केल्याने तुमचे शरीर आतून मजबूत आणि निरोगी राहते. जाणून घेऊया, हिवाळ्यात दररोज तुळशीची चार पाने खाण्याचे काय फायदे होतात?
तुळशीची पाने खाण्याचे फायदे
1. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते
तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे तुळस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हिवाळ्यात सर्दी, घसा खवखवणे यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो.
2. सर्दी आणि खोकल्यापासून आराम
तुळशीच्या पानाच्या सेवनाने कफ कमी होतो. याचे अँटीबायोटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म घसा खवखवणे आणि खोकला बरा करण्यासाठी प्रभावी आहेत. रोज तुळस खाल्ल्याने खोकला आणि सर्दीमध्ये आराम मिळतो.
3. डिटॉक्स म्हणून कार्य करते
तुळशीचे पान शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. हे शरीराला आतून स्वच्छ करते आणि त्वचा तजेलदार बनवते. त्यामुळे तुळशीची चार पाने रोज खावीत.
4. पचन सुधारते
तुळशीची पाने पचनसंस्था मजबूत करतात. हिवाळ्यात अनेकदा लोकांना पचनाच्या समस्येचा त्रास होतो, त्यामुळे तुळशीचे सेवन खूप फायदेशीर ठरते. रोज तुळशीची पाने खाल्ल्याने त्याचा परिणामही तुम्हाला पाहायला मिळेल.
5. तणाव कमी करण्यास मदत करते
तुळस ही नैसर्गिक अँटी-डिप्रेशन मानली जाते. याच्या सेवनाने हिवाळ्यात सिझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर किंवा तणाव कमी होण्यास मदत होते.
6. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
तुळशीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात. हे हृदयाचे आरोग्य राखण्यास देखील मदत करते. अशावेळी तुमच्या आहारात तुळशीच्या पानांचा जरूर समावेश करा.
7. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
तुळशीचे दररोज सेवन केल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते. त्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करतात. याशिवाय हे केसगळती रोखते आणि त्यांना निरोगी देखील बनवते.
तुळशीचे सेवन कसे करावे?
तुळशीची चार ताजी पाने रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याबरोबर घ्यावीत. तुळशीची पाने पाण्यात उकळून हर्बल चहा म्हणून प्या. मधासोबत तुळशीचे सेवन केल्याने त्याचे फायदेही वाढतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List