जॅकलिनच्या ठग बॉयफ्रेंडचं तुरुंगातून पत्र; मोदींचे कौतुक तर, भारतासाठी करणार ही गोष्ट
जॅकलिन फर्नांडिसचा कथित बॉयफ्रेंड अन् कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली 2015 मध्ये अटक करण्यात आलेला ठग सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. पण तरीही तो चर्चेत असतो. नुकतचं त्याने जॅकलिनसाठी फ्रान्समधील एक मोठी प्रॉपर्टी तिच्या नावावर केल्याचं समोर आलं होतं. एवढच नाही तर तिच्यासाठी त्याने तुरुंगातून प्रेमपत्रही लिहिले होते. ते प्रचंड व्हायरलही झाले होते.
सुकेशने थेट निर्मला सीतारामन यांना लिहिलं पत्र
दरम्यान आता सुकेशचे अजून एक पत्र व्हायरल झाले आहे. त्याने पत्र तुरुंगातूनच लिहिल असून त्याने त्या पत्रात अनेक मोठे खुलासे केले आहे. सुकेशने थेट निर्मला सीतारामन यांना एका पत्र लिहिले आहे, त्याने पत्रात म्हटल्याप्रमाणे नेवाडा आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणीकृत असलेले त्यांचे परदेशी व्यवसाय, एलएस होल्डिंग्ज इंटरनॅशनल आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन, ऑनलाइन आणि ऑफलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीमध्ये गुंतलेले आहेत.
त्याला 7 हजार 640 कोटींच्या उत्पन्नावर टॅक्स भरायचा आहे
त्याचा व्यवसाय अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई आणि हाँगकाँगमध्ये सुरू आहे. भारतातील सर्व प्रलंबित आयकर वसुली आणि अपील निकाली काढण्यास तो तयार असल्याचेही त्याने म्हटले आहे. म्हणजेच त्याला त्याच्या 7 हजार 640 कोटींच्या उत्पन्नावर टॅक्स भरायचा असल्याचं त्याने पत्राद्वारे कळवले आहे.
एवढच नाही तर पत्रात सुकेशने चंद्रशेखरने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. सुकेशच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली त्याला त्याच्या परदेशी उत्पन्नावर कर भरून आणि देशात गुंतवणूक करून भारताच्या विकासात योगदान द्यायचं आहे.
पत्रात मोदींचे कौतुक तर, देशासाठी काहितरी करण्याची इच्छा
तसेत त्याने असही म्हटल आहे की, “आजपासून, एक अभिमानी भारतीय म्हणून, आपल्या पंतप्रधान मोदीजींच्या महान नेतृत्वाखाली, मला या महान राष्ट्राच्या जागतिक स्तरावरील विकासात योगदान द्यायचे आहे. आतापासून मी माझ्या परदेशी उत्पन्नावर स्वेच्छेने भारतीय कर भरेन.” याचा अर्थ सुकेशने त्याचे परकीय उत्पन्न भारतात गुंतवण्याचा निर्णय घेतल्याचं त्याने सांगितले आहे. सुकेशचे हे पत्र सध्या प्रचंड व्हायरल झालं आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List