‘बिग बॉस’चे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा

‘बिग बॉस’चे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा

‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले येत्या 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात आठ स्पर्धक असून त्यांच्यामध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगली आहे. त्यातही विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा या दोघांपैकी एकाची जिंकण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज प्रेक्षक वर्तवत आहेत. अशातच ‘बिग बॉस 11’ची विजेती आणि अभिनेत्री शिल्पा शिंदेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पाने बिग बॉसच्या विजेत्याविषयी मोठा खुलासा केला आहे. ‘बिग बॉस’चे निर्माते प्रेक्षकांना फसवतात, असं तिने म्हटलंय. शोचे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात, असाही दावा शिल्पाने केला आहे.

या व्हिडीओमध्ये शिल्पा म्हणते, “मला माहीत नाही, पण काही लोकांना हे समजलंय की निर्माते स्वत:च विजेता निश्चित करतात आणि स्वत:च त्याला विजेता बनवतात. ते स्वत:च्या घरातून उचलून आणतात आणि स्वत:च दाखवतात. चॅनलची स्ट्रॅटेजी आता लोकांना समजली आहे. म्हणून कदाचित आता बिग बॉसचा प्रेक्षकवर्ग कमी झालाय. तुम्ही एका मर्यादेपर्यंत लोकांची फसवणूक करू शकता, त्यानंतर नाही.” शिल्पाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

‘बरोबर बोललीस शिल्पा, तू स्वत:लाच एक्सपोज केलंस. तुझ्यापेक्षा हिना खानला ट्रॉफी मिळायला हवी होती’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुझ्या सिझनमध्येही प्रेक्षकांची फसवणूक करून तुला विजेती बनवलं होतं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. शिल्पा शिंदेनं बिग बॉसच्या अकराव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. या सिझनमध्ये तिची अभिनेत्री हिना खानसोबत टक्कर होती. हिनाच या सिझनची विजेती ठरेल, असा अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवला जात होता. मात्र ऐनवेळी शिल्पा या शोची विजेती ठरली. आता शिल्पाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी पुन्हा एकदा हिनाच विजयास पात्र होती, असं मत व्यक्त करत आहेत.

‘बिग बॉस 18’मध्ये करणवीर मेहरा, विवियन डिसेना, चुम दरांग, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, चाहत पांडे आणि रजल दलाल हे आठ स्पर्धक राहिले आहेत. बिग बॉसचा हा नवीन सिझन 6 ऑक्टोबर 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. येत्या 19 जानेवारी रोजी ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्याचं आंदोलन मागे, एसआयटीच्या भेटीनंतर काय म्हणाले धनंजय देशमुख? उद्याचं आंदोलन मागे, एसआयटीच्या भेटीनंतर काय म्हणाले धनंजय देशमुख?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता एक महिना उलटला आहे. या प्रकरणात...
नैसर्गिक रित्या बनवा तुमचे केस चमकदार आणि दाट, जाणून घ्या आयुर्वेदिक हेअर केअर टिप्स
एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार! मुंबईत महापालिका निवडणुकीआधी मोठा ट्विस्ट
अटल सेतूला एक वर्षे पूर्ण, वर्षभरात ८३,०६,००९ वाहनांचा प्रवास
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, शिवसेनेच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी होणार?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठं ट्विस्ट; नवीन एसआयटीची स्थापना, कारण काय?
अमरावतीत ‘मिनी बांगलादेश’? किती लोकांना मिळालं नागरिकत्व; किरीट सोमय्या यांच्या खळबळजनक आरोपाने सर्वच हादरले