पिरियड्सच्या वेदनेमुळे रडत रडत सेटवर पोहोचली अभिनेत्री, दिग्दर्शकाने दिली अशी प्रतिक्रिया
बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींप्रमाणेच साउथमध्येही अशा काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. अशीच एक अभिनेत्री आहे जी तिच्या स्पष्ट बोलण्याबाबत नेहमी चर्चेत असते. ही साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे नित्या मेनन.नित्याने तिच्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
नित्या मेनन नेहमी तिच्या रोखठोख भूमिकेमुळे चर्चेत असते. ती नेहमी संवेदनशील मुद्द्यांना खूप चांगल्या पद्धतीने हाताळत त्याबाबत आपलं मत मांडते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री नित्या मेनन हिने मीडिया समोर इंडस्ट्रीबद्दल काही गौप्यस्फोट केले आहेत. त्यातील एक किस्सा हा तिचा स्वत:चा होता तो म्हणजे पिरियड्स क्रॅम्प्समुळे ती एकदा सेटवर उशिरा पोहोचल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले.
अभिनेत्रीने सांगितलं फिल्म इंडस्ट्रीतले कटू सत्य
अभिनेत्री नित्या मेनन हिने इंडस्ट्रीत काम करताना येणाऱ्या मानसिकतेबद्दल भाष्य केलं, “तुम्ही कितीही आजारी असलात किंवा अडचणीत असलात तरी, तुम्ही येऊन तुमचं काम करावं, अशी अपेक्षा असते. आपल्याला त्याची सवय झाली आहे”
अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीतील कटू सत्य जगासमोर उघड केलं आहे. तिच्या आगामी ‘कधलिक्का नेरमिल्लई’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नित्याने एका मुलाखतीत असे अनेक सत्य उलगडले आणि त्यावरूनच तिने इंडस्ट्रीला अमानवी म्हटलं आहे.
तसेच पुढे ती म्हणाली की स्टार्सना काही वेळा वाईट वागणूक दिली जाते. तुम्ही कितीही आजारी असलात तरी तुम्ही सेटवर येऊन परफॉर्म करणे अपेक्षित असतं. आता आपल्याला त्याची सवय झाली आहे. काहीही झाले तरी संघर्ष करावा लागतो” असं म्हणत तिने या प्रकारांबद्दल संताप व्यक्त केला आहे. तिने अगदी धीटपणे सांगितलेल्या या सत्याबद्दल तिचं कौतुक केलं जात आहे.
नित्याचा मासिक पाळीचा तो किस्सा
नित्याने 2020 साली ‘सायको’ या चित्रपटात निर्माता मायस्किनसोबत काम करण्याचा तिचा अनुभवही शेअर केला, जो तिच्यासाठी खूपच वेगळा असल्याचं तिने म्हटलं.
शूटिंगच्या पहिल्या दिवशी नित्याला मासिक पाळी आली होती आणि तिला भयंकर वेदना होत होत्या. वेदना असह्य झाल्याने तिला काम करणं शक्य नव्हतं, त्यावेळी नित्याने याबद्दल दिग्दर्शक मायस्किन यांच्याशी बोलण्याचं धाडस केलं. यावेळी त्यांनी तिला समजून घेतलं. दिग्दर्शकाची अशी प्रतिक्रिया पाहून नित्यालाही आश्चर्य वाटले होते. कारण इंडस्ट्रीमध्ये याबाबतीत इतकी संवेदनशीलता प्रत्येक जण दाखवत नसल्याचंही ती म्हणाली.
पहिल्यांदाच मेल डायरेक्टरसोबत मासिक पाळीबद्दल चर्चा
नित्याने सांगितले की तिने पहिल्यांदाच एका मेल डायरेक्टरसोबत मासिक पाळीबद्दल चर्चा केली होती. जेव्हा मायस्किन यांना तिच्या या वेदनेबद्दल समजले तेव्हा त्यांनी तिला आराम करण्यास सांगितला.तसेच काहीही काम न करण्याचाही सल्ला दिला. तसेच आणि तिची तब्येत ठिक वाटल्यावर सेटवर यायला सांगितलं.
दिग्दर्शक मायस्किन यांनी यावेळी नित्याला सांगितलं होतं की, त्यांनाही आई, पत्नी आणि मुली आहे. दिग्दर्शकाची ही प्रतिक्रिया पाहून फार आनंद झाल्याचंही तिने सांगितलं.दिग्दर्शकाच्या या प्रतिक्रियेनंतर नित्या खूपच प्रभावित झाली होती. तिला याबद्दल फार समाधानही वाटलं होतं.
दरम्यान नित्या मेनन 19 वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये आहे. या काळात तिने दिग्गज सेलिब्रिटी आणि दिग्दर्शकांसोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. माध्यमांशी बोलताना तिने फिल्म इंडस्ट्रीबद्दलच्या या गोष्टी आणि तिचे अनुभव उघड केले होते. तसेच नित्याने मायस्किन यांच्यासारखी संवेदनशीलता सर्वांमध्येच असावी असंही म्हटलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List