‘सलमानसोबत लग्न कर अन् क्यूट मूलांना जन्म दे’; अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा
बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्या चाहत्यांना प्रचंड आवडतात तर, काही सेलिब्रिटींच्या जोड्या व्हाव्यात अशी चाहत्यांची इच्छा असते. कधी कधी तर चाहते चक्क अभिनेत्री किंवा अभिनेत्याच्या प्रोफाइलवर जावून मेसेजही करतात. त्यांची जोडी कोणत्या सेलिब्रिटीसोबत शोभून दिसेल याबाबत थेट मेसेज करतात, कमेंट करतात. सेलिब्रिटी शक्यतो चाहत्यांची ही बाब अगदीच गंमत म्हणून घेतात कारण त्यांनाही हे माहित असतं की चाहते हे त्यांच्यावरील प्रेमामुळे असं बोलत आहेत.
अमीषा पटेलला अजब सल्ला
असाच एक किस्सा बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला आहे. एका अभिनेत्रीला चक्क चाहत्यांनी सलमान खानसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला. एवढच नाही तर तिला पुढे असाही मेसेज करण्यात आला की सलमान खानसोबत लग्न करून क्यूट मुलांना जन्म द्या. ही अभिनेत्री आहे ‘गदर’ फेम अमीषा पटेल.
आमीषाने स्वत:च हा किस्सा सांगितला आहे. आमीषाने X अकाऊंटवरुन चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी तिने askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये सिंगल असलेल्या अमीषाला चाहत्याने सलमान खानबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला. “सलमान खानने अद्याप लग्न केलेलं नाही आणि तू पण अविवाहित आहेस. आम्ही तुमचं लग्न होताना पाहून शकतो का? हे शक्य आहे का?”, असं चाहत्याने तिला विचारलं होतं. यावर आमीषाने मजेशीर उत्तरही दिलं होतं.
“सलमानसोबत लग्न करा आणि क्यूट मुलांना जन्म द्या”
एवढच नाही तर आमीषाने हेही सांगितलं की आताही तिला अनेक चाहत्यांचे मेसेज येतात. की,” तुम्ही सलमानसोबत लग्न करा आणि क्यूट मुलांना जन्म द्या. तुमची जोडी खूप छान दिसेल” असं एका चाहत्याने म्हटलं होतं. तर एकाने म्हटलं होतं की, ” तुमचं एकमेकांवर प्रेम नसलं तरी सुद्धा तुम्ही फक्त लग्न करा आणि क्यूट मुलांना जन्म द्या. आम्हाला तुमची क्यूट मुल पाहायला आवडतील.” या सर्व कमेंट आमीषा फार मनावर न घेता ती गंमतीत घेते. पण तिला चाहत्यांच्या या कल्पनेचं आणि त्यांच्या सल्ल्यांचं कौतुक वाटतं.
49 वर्षांची आमीषा अद्यापही सिंगलच
दरम्यान आमीषा ही 49 वर्षांची असून ती अद्यापही सिंगलच आहे. अमीषा पटेल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे.
‘कहो ना प्यार है’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. पण, 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ सिनेमाने अमीषा प्रसिद्धीझोतात आली.
यानंतर ‘हमराज’, ‘आप मुझे अच्छे लगने लगे’, ‘क्या यहीं प्यार है’, ‘मंगल पांडे’ अशा अनेक सिनेमांमध्ये ती झळकली. तसेच आमीषा ‘गरद 2’ मध्येही तेवढीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पण बॉलिवूड करिअरपेक्षा आमीषाच्या अफेरच्या चर्चा फार झाल्याचं पाहायला मिळालं. एवढच नाही तर तिच्या घरगुती वादांबद्दलही बऱ्याच चर्चा मीडियामध्ये होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List