रॅबिट फीव्हर म्हणजे काय? लक्षणे कोणती? जाणून घ्या

रॅबिट फीव्हर म्हणजे काय? लक्षणे कोणती? जाणून घ्या

अमेरिकेत रॅबिट फीव्हर हा चिंतेचा विषय बनला आहे. रॅबिट फीव्हर ज्याला टुलारेमिया देखील म्हणतात, हा एक दुर्मिळ आजार आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत हा आजार वाढत असून, हा चिंतेचा विषय बनला आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या म्हणण्यानुसार, 2011 ते 2022 दरम्यान टुलारेमियाच्या प्रकरणांमध्ये 56 टक्के वाढ झाली आहे.

आजाराचा सर्वाधिक धोका कुणाला?

या आजाराचा सर्वाधिक धोका पाच ते नऊ वयोगटातील मुले, वृद्ध पुरुष आणि अमेरिकन भारतीय किंवा अलास्का मूळ निवासी यांना आहे. त्याचबरोबर जंगलात जाणाऱ्या लोकांमध्ये त्याचा धोका लक्षणीय वाढतो. अशा वेळी या आजाराला सविस्तर समजून घेणं गरजेचं आहे.

सहसा संसर्गाची लक्षणे तीन ते पाच दिवसांत दिसून येतात आणि त्यात तीव्र ताप (104 डिग्री फॅपर्यंत), अंगदुखी, थकवा आणि थंडीचे थरथरणे यांचा समावेश असतो. संसर्गाच्या ठिकाणाजवळ लिम्फ नोड्सची सूज येणे देखील एक सामान्य लक्षण आहे. या आजाराचे चार प्रकार आहेत. अल्सररोगँडुलर, ग्रंथी, न्यूमोनिक आणि टायफॉइडल हे या आजाराचे प्रकार आहेत.

टुलेरेमिया कसा पसरतो?

‘फ्रान्सिसेला टुलारेन्सिस’ नावाच्या जीवाणूमुळे टॅलेरेमिया पसरतो. ससे, हरीण यांसारख्या संक्रमित जनावरांच्या संपर्कामुळेही हा आजार होतो. याशिवाय बाधित जनावरांचे मांस किटकांच्या चाव्यानेही हा आजार पसरू शकतो.

टुलारेमियाची प्रकरणे का वाढत आहेत?

उष्णतेमुळे किटकांची क्रियाशीलता वाढते व त्यांच्या प्रजननाचा हंगाम जास्त असतो, त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
जंगलतोड आणि जैविक अधिवासात राहण्यामुळे बाधित प्राण्यांशी संपर्क वाढत आहे.
सुधारित आरोग्य सेवा आणि चांगल्या देखरेखीमुळे प्रकरणे शोधणे सोपे झाले आहे.

उपचार कोणते आहेत?

टुलेरेमियाचा उपचार अँटीबायोटिक्सद्वारे केला जाऊ शकतो. स्ट्रेप्टोमायसिन आणि जेंटामाइसिन हा पहिला पर्याय आहे, तर सौम्य प्रकरणांमध्ये डॉक्सीसाइक्लिन किंवा सिप्रोफ्लोक्सासिनचा वापर केला जातो. उपचार 10 ते 21 दिवस टिकू शकतात आणि लवकर सुरू केल्यास रुग्ण बरे होतात आणि गंभीर गुंतागुंत टाळू शकतात.

लक्षात घ्या की, या आजाराचा धोका हा मुले, वृद्ध पुरुष यांना आहे. त्यामुळे काळजी घ्या. अशा कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसल्यास आधी डॉक्टरांकडे जा.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं
ज्या महिलेची आकलन क्षमता कमी आहे तिला आई होण्याचा अधिकार नाही का ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी उपस्थित...
भाजपा प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच खांद्यावर धुरा? स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी कोणते मिशन?
दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट; खळखळून हसवणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर
हंसिका मोटवानीच्या वहिनीने सासू, नणंद अन् पतीविरोधात दाखल केला FIR; नेमकं काय आहे प्रकरण?
उदित नारायण यांच्या इमारतीला आग, एकाने गमावले प्राण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
पुनर्वसनात पती-पत्नीला दोन घरे मिळणार नाहीत, हायकोर्टाचा निर्वाळा; स्वतंत्र झोपडीचा दावा फेटाळला
मुंबईत घर मिळण्याची गिरणी कामगारांची आशा पल्लवित, वरळीतील पाच एकरचा भूखंड महापालिकेकडेच राहणार