निवडणुकांच्या धामधुमीत विकासकामांना खीळ, तब्बल 900 कोटींची भांडवली रक्कम शिल्लक

निवडणुकांच्या धामधुमीत विकासकामांना खीळ, तब्बल 900 कोटींची भांडवली रक्कम शिल्लक

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या विकासकामांना मोठी खीळ बसली आहे. महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात भांडवली खर्चासाठी १ हजार ४२२ कोटी ३२ लाखांची तरतूद करण्यात आली असताना आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत फक्त ५२६ कोटी ६३ लाखांचा खर्च झाला आहे. तब्बल ८९५ कोटी २६ लाखांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांत ९०० कोटींची रक्कम खर्ची करण्याचे स्थापत्य विभागापुढे उद्दिष्ट असणार आहे.

महापालिकेच्या विविध काँक्रीट व डांबरी रस्ते, पूल, उड्डाणपूल, इमारत, शाळा, रुग्णालय, प्राणिसंग्रहालय, क्रीडांगण, उद्यान, अर्बन स्ट्रीट डिझाईन, हरित सेतू, मस्त्यालय व इतर विकासकामे, योजना व प्रकल्पांसाठी मोठा भांडवली खर्च केला जातो. तो अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि महसुली खर्चानंतरचा सर्वाधिक मोठा खर्च असतो. निविदा प्रक्रिया राबवून वर्क ऑर्डर दिलेल्या कामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद केलेली असते.

मागील वर्षापासून सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकात पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. अशा भांडवली खर्चासाठी सन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात तब्बल १ हजार ४२२ कोटी | ३२ लाख रकमेची तरतूद करण्यात आली | होती. ती रक्कम वर्षभरात खर्च केली जाणे अपेक्षित आहे. मात्र, ९ महिने उलटले तरी | स्थापत्य विभागाकडून फक्त ५२६ कोटी | ६३ लाख रुपये खर्च झाले आहेत. हे प्रमाण | ३७.०४ टक्के इतके अल्प आहे. अद्याप | तब्बल ८९५ कोटी २६ लाखांचा निधी | पडून आहे. ती रक्कम पुढील ३ महिन्यांत । खर्च न झाल्यास शिल्लक पडणार आहे. त्यानंतर ती रक्कम इतर कामांना वळविली जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांचा वेग मंदावला होता. स्थापत्य विभागाकडून शहरात वेगवेगळी कामे सुरू आहेत. त्या कामाच्या टप्प्यानुसार। यानुसार बिले काढली जातात. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत कामे पूर्ण करण्यावर अधिक भर दिला जातो. संबंधित ठेकेदार या महिन्यात मोठ्या प्रमाणात बिले सादर करतात. त्यामुळे ३१ मार्च २०२५ पर्यंत भांडवली खर्च अधिकाधिक खर्ची होईल.

मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

अंदाजपत्रकातील तरतूद

    • भांडवली खर्च तरतूद १ हजार ४२२ कोटी ३२ लाख
    • नऊ महिन्यांत खर्च ५२६ कोटी ६३ लाख
    • शिल्लक निधी- ८९५ कोटी २६ लाख

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल; चाहते बिग बींच्या प्रकृतीबद्दल चिंतेत अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल; चाहते बिग बींच्या प्रकृतीबद्दल चिंतेत
संगम शहर प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला आहे. मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी येत आहेत. कडाक्याच्या थंडीतही भक्तांची श्रद्धा कमी पडताना दिसत...
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा न्यायालयीन समिती करणार तपास
Sadhvu Harsha Richhariya – महाकुंभमध्ये चेहऱ्याचं सौंदर्य महत्त्वाचं नसतं, साध्वी हर्षा रिछारिया यांच्यावर संतापले शंकराचार्य
रशियाचा युक्रेनवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 100 ठिकाणांवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली
परळीतील धनंजय मुडेंच्या टोळ्या आणि दहशत संपवली पाहिजे; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक
सीनदरम्यान अभिनेत्याच्या ओठांचा स्पर्श होताच अभिनेत्रीला उलट्या; 100 वेळा दात घासले अन् तोंड धुतलं
लंडनमध्ये पँटशिवाय फिरतायत तरुण-तरुणी, काय आहे ‘नो ट्राउजर ट्यूब राइड’? जाणून घ्या…