वेब सीरिज पाहून लिव्ह इन पार्टनरचा काटा काढला, फुटबॉल खेळाडूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
लिव्ह इन रिलेशन पार्टनरपासून पिच्छा सोडवण्यासाठी एका फुटबॉल खेळाडूने भयंकर कृत्य केले आहे. वेब सीरिज पाहून या खेळाडूने मित्राच्या मदतीने विवाहित प्रेयसीचा काटा काढला. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी खेळाडूला अटक केली आहे. मोहित सैनी असे आरोपीचे नाव आहे.
सैनी हा महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीप राहत होता. मयत महिला ही मूळची उत्तराखंडची रहिवासी असून विवाहित आहे. आरोपीला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचे होते. यासाठी त्याला पीडितेला आपल्या आयुष्यातून घालवायचे होते. यासाठी त्याने मिर्झापूर वेब सीरिज पाहून प्रेयसीच्या हत्येचा कट रचला.
सैनीने आपला मित्र ओंकारच्या मदतीने प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह जंगलातील कोरड्या विहिरीत फेकून दिला. स्थानिक पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासाअंती अखेर महिलेच्या हत्येचे गूढ उकलले. त्यानंतर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List