तारापूर एमआयडीसीमध्ये परफ्युमच्या कंपनीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
बोईसरमधील तारापूर एमआयडीसीत परफ्युमच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी घडली. परिसरात लांबच लांब आगीचे लोळ उठले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
तारापूर एमआयडीसीतील युके अॅरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्याला आग लागली. रविवार असल्याने कामगारांना सुट्टी असल्याने मोठी जीवितहानी टळली. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
युके अॅरोमॅटिक अँड केमिकल्स या कंपनीला आधी आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले. आगीचा भडका वाढल्याने शेजारी असलेल्या श्री केमिकलमध्ये आग पसरली. स्थानिक प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List