‘मी गौतमीला कधी कलाकार मानलंच नाही, गौतमी आणि प्राजक्ताची तुलना…’, दिपाली सय्यद काय म्हणाल्या?

‘मी गौतमीला कधी कलाकार मानलंच नाही, गौतमी आणि प्राजक्ताची तुलना…’, दिपाली सय्यद काय म्हणाल्या?

ज्येष्ठ अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आज अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. डान्सर गौतमी पाटील हिनेदेखील प्राजक्ता माळी हिचं समर्थन केलं आहे. त्यामुळे गौतमी हिच्याबद्दल दिपाली सय्यद यांना प्रश्न विचारलं असता, त्यांनी गौतमी आणि प्राजक्ता यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही, असं स्पष्ट वक्तव्य केलं आहे. “गौतमी पाटील हिला टार्गेट केलं होतं तेव्हा मी गौतमी पाटील कोण आहे? हे मला माहीत नव्हतं आणि जेव्हा कळलं की गौतमी पाटील ही आहे आणि ती माझ्यासमोर जेव्हा कलाकार म्हणून आली. वेगवेगळे छटा असतात आणि स्टेजवर अश्लील भाव आणले होते तर मी तिला कधी कलाकार मानलं नाही. आणि त्यासाठी तिच्या बाजूने बोलणं हे सुद्धा मला असं वाटलं होतं की आपण याच्याबद्दल बोलणं हे चुकीचं आहे. गौतमीला प्राजक्तासोबत तुलना करणं चुकीचं आहे. गौतमी पाटील चुकीची होती म्हणून तिच्याबाजूने कोणी उभं राहिलं नाही आणि प्राजक्ता माळी वेगळी आहे, जिथे गौतम पाटीलला सब्जेक्टच नाही”, असं मत दिपाली सय्यद यांनी मांडलं.

“संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. देशमुखांना न्याय मिळावा यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते. काहीतरी चांगल्या गोष्टी होत होत्या, यामुळे बरं वाटत होतं. संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, असं वाटत होतं. पण त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्व गोष्टी दुसरीकडे लक्ष केंद्रीत झालं. त्याचं मला वाईट वाटलं. मी काल प्राजक्ताची पत्रकार परिषद पाहिली. एक कलाकार म्हणून मला प्राजक्ताला रडताना बघितलं तेव्हा वाईट वाटलं. माझं असं झालं की, तू रडता कामा नये. तू महाराष्ट्राची आवडती कलाकार आहेस. तुला तुझं मत मांडण्याचा अधिकार आहे. हे मत तू कधी मांडायला हवं होतं? जेव्हा करुणा धनंजय मुंडेंनी नाव घेतलं होतं. त्यावेळेलाच तिला पत्रकार परिषद घेऊन ठासून विचारायला हवं होतं की, मी काय गोष्टी अशा केल्या की ज्यामुळे तुम्ही माझं नाव घेत आहेत. करुणा मुंडे ही धनंजय मुंडे यांची पत्नी आहे. त्यामुळे जेव्हा घरातील एखादी व्यक्ती असं म्हणते तेव्हा तिला उत्तर द्यायलाच हवं होतं”, अशी भूमिका दिपाली सय्यद यांनी मांडली.

‘धस यांनी फक्त प्राजक्ताची नाही तर कलाकारांची माफी मागावी’

“सुरेश धस आण्णा यांनी जे वक्तव्य केलं, त्यात त्यांनी चूक केलेली आहे. आण्णांनी संतोष देशमुख यांच्यासाठी लढा सुरु केला होता. पण त्यांनी कलाकारांची जी नावे घेतली ते चुकीचं होतं. तिथे एकटी प्राजक्ता नव्हती तर इतर कलाकारही होते. हे व्हायला नको होतं. ते चुकीचं होतं. आण्णांनी ज्या पद्धतीने धुडकावून लावलं आहे ती गोष्ट चुकीची आहे. त्यांनी फक्त प्राजक्ताची नाही तर सर्व कलाकारांचीच माफी मागायला हवी”, अशी मागणी दिपाली सय्यद यांनी केली.

‘तुमच्याकडे पुरावा नसताना कलाकारांचं नाव घेणं हे चुकीचं’

“अशा पद्धतीने कलाकारांचं नाव घेणं फार चुकीचं आहे. राजकीय नेतेच कला किंवा क्रीडा महोत्सव घेतात. अशावेळी कलाकारांना निमंत्रित केलं जातं. तिथे जावून कलाकार त्यांची कला सादर करतात. कुणी नृत्य, कुणी नाटक, तर कुणी गाणं गातं. याचा अर्थ असा होतो की, सर्वच कलाकार असेच आहेत का? तुम्ही अशापद्धतीने कलाकारांचं नाव कसं घेऊ शकता? ही गोष्ट जर परळीपर्यंत असेल तर मग तुम्ही पुरावा सादर करायला हवा. तुमच्याकडे पुरावा नसताना कलाकारांचं नाव घेणं हे चुकीचं आहे”, असं मत दिपाली सय्यद यांनी मांडलं.

“माझ्यासोबत अशा कित्येक गोष्टी झाल्या. मला देखील स्पष्टीकरण द्यावच लागलं. माझ्या फॅमिलीमध्ये मॉर्फ करून फोटो चिटकवले गेले होते. माझा पासपोर्ट चुकीचा बनवला होता. मी तर इंटरनॅशनल गुन्हेगार आहे, असं सिद्ध झालं होतं. तेव्हा मला स्पष्टीकरण द्यावच लागलं होतं की असं नाहीय म्हणून. हा एकटा प्राजक्ताचा नाही तर सर्व कलाकारांचा विषय आहे”, असं दिपाली सय्यद म्हणाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मिशन मुंबई महानगर पालिका निवडणूक: ठाकरे गटाच्या आढावा बैठका 7 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार मिशन मुंबई महानगर पालिका निवडणूक: ठाकरे गटाच्या आढावा बैठका 7 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार
महायुतीचे सरकार विक्रमी बहुमत मिळून स्थानापन्न झाले आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीतील यश विधानसभा निवडणूकीत राखता आलेले नाही. आता महायुतीतील...
दिग्दर्शक अनुराग कश्यपचा मुंबई अन् बॉलिवूड सोडण्याचा निर्णय; नव्या दिशेने वाटचाल
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री होणार दुसऱ्यांदा आई?; व्हिडिओ शेअर करून दाखवले प्रेग्नेंसी किट
हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा केसांना तेल लावावं? जाणून घ्या फायदे…
जळगावमधील घटनेसाठी मंत्री गुलाबराव पाटील जबाबदार, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी प्रक्रिया सुरू; केंद्राने कुटुंबीयांना दिले जागेचे पर्याय
25 तारखेची लढाई अंतिम, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा