म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या सर्वसामान्यांचे हेलपाटे थांबणार

म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या सर्वसामान्यांचे हेलपाटे थांबणार

नागरिकांचे तक्रार अर्ज, टपाल या नागरी सुविधा केंद्रावर एकाच ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जांचे वर्गीकरण करून ते अर्ज संबंधित विभागाला पाठवण्यात येतील. त्या अर्जाचा फॉलोअपदेखील नागरिकांना याच केंद्रावर घेता येणार आहे. त्यामुळे म्हाडा मुख्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नागरिकांना भासणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हेलपाटे आता थांबणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी म्हाडा मुख्यालयात नागरी सुविधा केंद्र उभारण्यात येणार असून नुकतीच या केंद्राच्या कामाला सुरुवात झाली.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, गिरणी कामगार विभाग, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी कार्यालये आहेत. विविध कामानिमित्त दिवसाला सुमारे पाच हजार नागरिक या कार्यालयाला भेट देतात. एखाद्या विभागाशी संबंधित आपली तक्रार असल्यास तो विभाग शोधण्यापासून ते तक्रार दाखल केल्यानंतर त्या तक्रारीचा फॉलोअप घेण्यासाठी नागरिकांना वारंवार म्हाडा मुख्यालयात हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांचे हेलपाटे थांबावेत आणि म्हाडाचा कारभार लोकाभिमुख व्हावा यासाठी हे नागरी सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. नुकतीच मुख्यालयातील गेट क्रमांक 4 येथे या केंद्राच्या उभारणीला सुरुवात झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यावरून आता राजकारण...
राजघाटाऐवजी निघमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार, काँग्रेसचा आक्षेप
ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, तारीखही ठरली
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज! 2184 पोलीस अधिकारी आणि हजारोंचा फौजफाटा तैनात
देशाच्या प्रगतीत आणि विकासात डॉ. मनमोहन सिंग यांचे अतुलनीय योगदान, सोनिया गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली
घाटकोपरमध्ये भीषण अपघात, टेम्पोने 5 जणांना चिरडले; एका महिलेचा मृत्यू
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर चीन, रशिया आणि अमेरिकेसह अनेक देशांनी व्यक्त केला शोक